Thursday, 16 September 2021

 प्राथमिकता कशाला द्यायची हे विचारसरणी वर अवलंबुन असते.. नक्की वाचा..

दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध २७ वर्षाचा फुटबॉल खेळाडू सादिओ माने सेनेगल याची भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची कमाई १ करोड ४० लाख रूपये आहे. ह्या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोनसह पाहिलेले आहे. 

एक मुलाखती दरम्यान शेवटी मुलाखत घेणा-याने त्याला डिवचलेच की, तुमचा फोन तुटला आहे, तर त्यांनी सहजपणे पत्रकाराला उत्तर दिले की, "मी ठीक करून घेईल" 

परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही नवीन फोन का घेत नाही?? त्यावर सेनेगल बोलले की, असे हजार फोन मी घेवू शकतो, १० फेरारी घेवू शकतो. २ जेट विमान खरेदी करू शकतो. डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 

परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे ?? 

मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो. आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो ज्यामुळे मला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मानसिक समाधान मिळते़़़

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi