*ताणतणाव (डिप्रेशन) दूर करा*
🌹 *कारणे* 🌹
👉बदललेली जीवनशैली
👉 कौटुंबिक कलह पती-पत्नी,
सासू-सून, मुलगा-वडील इ..
👉सकारात्मक विचारांचा अभाव
👉 आजाराचे टेन्शन
👉 तामसी आहाराचे सेवन
👉 क्षणोक्षणी भावनांमध्ये बद्दल
👉 पुरेशी झोप न होणे
👉 पोट साफ नसणे
👉 चुकीचा संगती
पूर्वी माणसांना टेन्शन शारीरिक असायचे. हल्ली मानसिक टेन्शन जास्त प्रमाणात वाढलेला आहे.
*लक्षणे ---*
१) शुल्लक कारणावरून चिडचिड करणे रागावणे. क्षणोक्षणी मूड बदलणे अस्वस्थ होणे .
२) जास्तच खाणे किंवा अजिबात न खाणे.
३) झोप न येणे किंवा सतत झोपलेला असणे
४) चहा, काॅफी, धुम्रपान, मद्यपान इ. व्यसन लागणे.
५) निर्णयक्षमता कमी होणे .
६) डोकेदुखी, अपचन, आम्लपित्त, मानदुखी, त्वचारोग, हृदयाची धडधड वाढणे, दात चावणे, बेशुद्ध होणे इ.
७) B.P. high होणे. किंवा low होणे.
८) जास्तच थकवा येणे. कामात उत्साह नसणे सतत आळस
९) पोट साफ न होणे. लघवी थांबणे
किंवा सारखे सारखे लघवीला जावे लागणे
*होणारे परिणाम व आजार*
१) रोगप्रतिकारकशक्ती कमी कमी होत जाते .
२) हार्टॲटॅक येणे .
३) लैंगिक समस्या निर्माण होणे .
४) सोरायसिस (Psoriasis) सारखे त्वचाविकार होणे .
५) पुरुषांना अल्सर व हृदयरोग होतात. तर स्त्रियांना अस्वस्थता व नैराश्य येते
६) सतत बडबड करणे किंवा शांत राहणे
७) मधुमेहासारखे आजार जडणे
८) कुठले तरी आजार होणे व बरे न होणे
९) असंबंध कृती करणे
*उपाय*
१) प्रत्येक विचार सकारात्मकच करा.
२) दुःखी होण्यापेक्षा आनंदी विचार करण्याची सवय लावा.
३) शाकाहारी राहून पौष्टिक व सात्विक आहार घ्या.
४) गरजेपेक्षा जास्त खाऊ नका. नाहीतर शारीरिक व बौद्धिक थकवा लवकर येईल.
५) एकच काम जास्त वेळ न करता, वेगवेगळी कामे करा.
६) सामाजिक संबंध वाढवा, त्यासाठी नातेवाईक, शेजारधर्म व मित्रमैत्रिणी जोडा.
७) करमणूकीकरीता छंद जोपासणे .
८) विश्रांती घ्या. ध्यानधारणा थोडावेळ तरी करा.
९) टेन्शन आल्यास भरपूर हसा किंवा रडा. टेन्शन नक्कीच कमी होणार.
१०) व्यसने केल्याने टेन्शन कमी न होता टेन्शन सहन करण्याची क्षमता नष्ट होते.
११) नियमित ध्यान, प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार इ. करा.
१२) टेन्शन आल्यास हातापायांचे तळवे घासा व प्रेस करा.
*हे सोपे उपाय आहेत.*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
No comments:
Post a Comment