Saturday, 11 September 2021

 *गॅस सिलिंडरचा विमा असतो,*

*हे तुम्हाला माहित आहे का ?*

*-----------------------------------------*

आपण *एलपीजी गॅस*

*कनेक्शन* खरेदी करतो,


गॅस आपल्या घरी येतो.

आपण *नियमित सिलिंडर घेतो.*


या *सगळ्या व्यवहारात* *आपल्या*

*नावाने एक विमा निघालेला आहे,*


याची आपल्याला

कल्पना तरी असते का..?


स्वयंपाकाच्या गॅसचा

आपल्या घरात अपघात,


स्फोट वगैरे झाला

तर आपण काय करतो..?


आपण *उपचारांचा,*

*घरदुरूस्तीचा* सगळा *खर्च* करतो.


कारण, आपला विमा आहे,

याचा आपल्याला पत्ताच नसतो...?


अपघाताच्या वेळी,

जर तो अपघात सदोष,


*गॅस सिलिंडरमुळे* किंवा

*यंत्रणेमुळे* झाला असेल,


तर विमा

कंपनीकडुन ग्राहकाला,


*४० लाख रूपयां पर्यंत*

 *नुकसान भरपाई मिळू शकते...!!*


जर *नुकसान मोठ्या प्रमाणावर* असेल,


तर भरपाईची रक्कम

*५०* लाखापर्यंतही जाऊ शकते.


*📍ही माहिती ना सरकार*

*आपल्याला देत, ना गॅस कंपन्या.*


जर चुकून कघी

असा प्रसंग ओढवलाच,


तर गॅस कंपनीकडे विमा

मागायला विसरू नका...!!!! 


ही माहिती सर्वांपर्यंत

पोहोचवा, सर्वाना कळु दे. 


या करिता

नक्की शेअर करा...


धन्यवाद....


अभिकर्ता 

भारतीय आयुर्विमा महामंडळ.

.

*📍एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.आपण ही आजचं तपासा!*

*-----------------------------------------*


जर आपल्या गॅस सिलेंडरची *एक्सपायरी डेट संपली* असेल  तर तो गॅस सिलेंडर म्हणजे *आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे.* त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे. 


*📍कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट.* 


सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी *गोल लोखंडी रिंग* असते. त्याच्या खाली *तीन रंगाच्या पट्ट्या* असतात. त्यातील *काळ्या रंगाच्या पट्टीवर* गॅस सिलेंडरची *एक्सपायरी डेट* असते. यावर *A,B, C आणि  D अक्षर* असल्याचे स्पष्ट होते. तसच या *अक्षरांसोबत दोन अंक* लिहिले असतात. *या अक्षरांवरुन* गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.


उदाहरणार्थ : 


A - जानेवारी ते मार्च 


B - एप्रिल ते जून 


C - जुलै ते सप्टेंबर 


D - आॅक्टेबर ते डिसेंबर 


या *शब्दांनंतर जे दोन अंक* लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!! 


समजा आपल्या गॅस सिलेंडरवर *A16* लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अाहे *मार्च 2016.* म्हणजे हा *गॅस सिलेंडर मार्च 2016 नंतर वापरणे गृहिणींसाठी घातक आहे.* 


कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या !!

*अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क करा व आपले कुटूंब सुरक्षित करा.*

9764431015

7798091409

9326359583

हा sms तुमच्या जवळच्या माणसां पर्यन्त जाऊ द्यात.  

*तुमच्या 1 sms  मुळे अनेक गृहिणी   सेफ राहु शकतात.*


 


 


 


 

 [9/11, 3:42 PM] Mahendra Gharat: ---------------------------

*ऋषिपंचमीचे महत्त्व*

----------------------------


*गृहस्थाश्रमी पुरुषांसंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम हा आचारसंपन्न व्हावा, असा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आला आहे.* 

कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. 

ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते.

*ऋषीची भाजी*

महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.

*ऋषिपंचमी पूजा मंत्र*

*कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।*

*जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।*

*गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।*

----------------------------------------------

[9/11, 3:42 PM] Mahendra Gharat: ------------------------

*ऋषिपंचमीचे व्रत*

-------------------------


*भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते.* 

कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. 

या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.

भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

------------------------------------------------

*संकलन :- सतीश अलोणी @*

-------------------------------------------------

 


Featured post

Lakshvedhi