Friday, 20 August 2021

 एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू

विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

 

            नागपूरदि. 20 : राज्य शासनाच्यावतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करूहे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

            सिताबर्डी- झीरो माईल फ्रिडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शन आणि फ्रीडम पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी ते (दूरदृष्यप्रणालीद्वारे) बोलत होते. ई-फ्लॅगद्वारे मेट्रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री डॉ. नितीन राऊत,  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदारनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेमहापौर दयाशंकर तिवारीविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसकेंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तसेच  खासदार कृपाल तुमानेसर्वश्री आमदार ॲङ आशिष जयस्वालॲङ अभिजित वंजारीविकास ठाकरेकृष्णा खोपडेराजू पारवेविकास कुंभारे अन्य स्थानिक लोकप्रतिनिधीविभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारेजिल्हाधिकारी आर. विमलामहामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीतकेंद्रीय सचिव श्री. दुर्गाप्रसाद मिश्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

           मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रगती आणि विकासासाठी राज्यात मेट्रोमहामार्गांचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रोची ही कामे उन्नत मार्गाने पुढे नेत आहोत. त्या मार्गाखालचा भागही प्रकल्पाचा भाग समजून त्याचा विकास करावात्याचे सौंदर्यीकरण करून नागरिकांसाठी तिथे सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबत महामेट्रोने विचार करण्याची सूचना यावेळी  मुख्यमंत्र्यांनी केली.

          महामेट्रोने नागपूरचा कायापालट केला आहे. मेट्रोचे कालबद्धतेने काम पूर्ण केले आहेअसे सांगून विकास कामे करताना राजकीय मर्यादा दूर ठेवण्याचा पायंडा नागपूरने पाडला असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

            नागपूर शहराच्या सौंदर्यात व विकासात भर घालणाऱ्या महामेट्रोच्या या सेक्शनचे सद्भावना दिवशी लोकार्पण व्हावे हे चांगले औचित्य आहे. फ्रीडम पार्कच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेची गाथा प्रेरणा देत राहील. वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. पालकमंत्री म्हणून विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे डॉ. नितीन राऊत यांनी आश्वस्त केले.        

            नागपूर मेट्रोच्या सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण भागातील या वाहतूक व्यवस्थेमुळे सुमारे एक लाख प्रवाशी मेट्रोशी जोडले जातील. रस्त्यांवरून देशाची ओळख होत असल्याचे सांगून नगरविकास मंत्री  एकनाथ‍ शिंदे म्हणालेकोविडच्या संकट काळातही राज्य शासन विकासकामांना चालना देत आहे. विदर्भ-मराठवाड्यासह मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेलअसे मंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. 

            केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागपूर महामेट्रोचा हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची विस्तृत माहितीही त्यांनी यावेळी दिली. फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी’ अंमलात आणली आहे. आवाज आणि कंपन कमी होण्यास त्यामुळे मदत होईलअसे ते म्हणाले.

 

            सिताबर्डी-झीरो माईल फ्रीडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शनचे काम हे सर्वात अभिनव आणि अद्वितीय फ्रेंच वास्तूशास्त्रज्ञाने बांधलेले स्थापत्याचे उत्तम शिल्प असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वीस मजली इमारत असलेले आणि चौथ्या मजल्यावरुन मेट्रो धावणारे हे नाविण्यपूर्ण राजपूत वास्तूकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कॉटन मार्केटपासून सायन्स कॉलेजपर्यंत प्रवासी वाहतूक सुलभ व्हावी यासाठी अंडरपास रस्ता करण्याचे त्यांनी जाहीर केले. मेट्रोचे हे स्टेशन आणखी आकर्षक होण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. तेलंगखेडी-फुटाळा येथील महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले संगीत कारंजाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे  करण्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. विकासकामांना कायम सहकार्य ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

            विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक झीरो माईलला फ्रीडमपार्क व वीस मजली मेट्रोच्या इमारतीमुळे भव्यता येणार असल्याचे सांगितले. महामेट्रोने देशात वेगाने काम केले असल्याची प्रशंसाही त्यांनी केली.

            सुरुवातीला या विषयीची संपूर्ण माहिती देणारी दृकश्राव्य फितीचे सादरीकरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गावरील प्रवासी सेवेचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी तर आभार ब्रिजेश दीक्षित यांनी आभार मानले.

 हृदयनाथ मंगेशकर हे त्यांच्या घरात लाडके! त्यांना सवय होती की जेवायला बसण्यापूर्वी व नंतर हात धुतले की ते माई मंगेशकरांच्या पदराला हात पुसत , लग्नानंतर पदराला हात पुसण्याचा शिरस्ता कायम राहिला फक्त पदर आईच्या ऐवजी पत्नीचा म्हणजे भारती मंगेशकरांचा झाला.

             शांताबाई शेळके ह्या मंगेशकरांना जवळच्या, एकदा मंगेशकरांकडे कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने शांताबाईंना भोजनाच आमंत्रण होत.कार्यक्रम म्हणून भारतीताईं कशिदाकाम केलेली रेशमी साडी नेसल्या होत्या ; हृदयनाथांबरोबर शांताबाई जेवायला होत्या,हृदयनाथांचे जेवण आटोपल्यावर त्यांनी हात धुतले आणि शिरस्त्याप्रमाणे हात पुसायला मोहरा भारतीताईंकडे वळवला आता नवी साडी खराब होईल म्हणून माझ्या साडीला हात पुसू नका अस भारतीताईं सांगत होत्या तरीही हृदयनाथ त्यांच्या रोखाने जायला लागले मग भारतीताईं पुढे धावताहेत आणि हृदयनाथ लंगडत मागे असा पकडापकडीचा खेळ तिथे उपस्थित असलेल्या शब्दसम्राज्ञी शांताबाईंनी पाहिला आणि तिथल्या तिथे गाण जन्माला आल......।


रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी काढिला

हात नगा लावू माझ्या साडीला!

नवी कोरी साडी लाखमोलाची

भरली मी नक्षी फूलवेलाची

गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला!

जात होते वाटंनं मी तोऱ्यात

अवचित आला माझ्या होऱ्यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?

हात नगा लावू माझ्या साडीला!

भीड काही ठेवा आल्यागेल्याची

मुरवत राखा दहा डोळ्यांची

काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला!

एका कार्यक्रमाला ही गोष्ट सांगतांना आशाताईं भोसले म्हणाल्या की मग त्या गाण्याला दीदीने चाल लावली, एके दिवशी मला दीदीने बोलवलं आणि सांगितलं आशा तुझ्यासाठी एक गाण बसवलय मग तिने ते मला गाऊन चाल शिकवायला सुरवात केली , तिच्या स्वभावाप्रमाणे अगदी मृदुमुलायम चाल! मी तिला म्हटल दीदी ही लावणी आहे की भजन ? मग दीदी म्हणाली मी अशी चाल लावली आहे तुला गायच तस गा मग एवढा privilege मिळाल्यावर आवश्यक बदल ,लावणीचा बाज ठेवत पहिल्या कडक ढोलकीसकट एक फर्मास अजरामर लावणी आशा ताईंनी सादर केली.

अशी एक अजरामर लावणी तयार झाली.

 माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविणार

माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील

पुरस्कारांची कार्यपद्धती व वेळापत्रक जाहीर

 

        मुंबई, दि. 20 : - राज्याची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपक्रमशीलता वाढवणे,उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान समुहांना सन्मानित करून समाजात त्यांची ओळख निर्माण करणे,समाजात माहिती तंत्रज्ञानाचा गतिमान वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणे,माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे,माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्या वतीने  राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती,माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

             माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील  आयटी इंजिनियरींग सर्व्हिस सॉफ्टवेअरआयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ)आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर)मोस्ट प्रॉमिसींग स्टार्टअप आणि स्पेशल अवार्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा 5 विभागात या पुरस्कारांची निवड होणार असल्याची माहिती राज्यमंत्री श्री.पाटील यांनी दिली.पुरस्कार मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारांचे  वेळापत्रक

            यावर्षीचे पुरस्कारांचे  वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.२० ऑगस्ट२०२१ रोजी नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार असून १५ सप्टेंबर२०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल.२७ सप्टेंबर२०२१ रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल.३० सप्टेंबर२०२१ रोजी छाननी समितीची प्राथमिक बैठक होईल तर २० ऑक्टोबर२०२१  छाननी समितीची अंतिम बैठक होईल.

            ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल,  अशी माहितीही राज्यमंत्री श्री. पाटील यांनी दिली.

           देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर हा आधुनिकीकरणाचा केंद्रबिंदू आहे. स्व. श्री राजीव गांधी यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व राष्ट्रीय विकासातील त्याचा परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. त्यामुळेच दरवर्षी. 20 ऑगस्ट हा माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून राज्य सरकारकडून साजरा करण्यात येतो.

0000


 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत

२००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबईदि. 20  : महाराष्ट्र शासनाने 6 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसुचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या क्रमांक एलएनएफ/ १०.१९/ प्र.क्र १०/अर्थोपाय दिनांक 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसुचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसुचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसुचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                            

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 24 ऑगस्ट  2021 रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 24 ऑगस्ट  2021 रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 25  ऑगस्ट   2021 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक २५ ऑगस्ट 2021 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 6 वर्षांचा असेल. रोख्यांचा   कालावधी  दि 25  ऑगस्ट  2021 पासून सुरु  होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 25 ऑगस्ट  २०२७ रोजी पुर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. २५ फेब्रुवारी  व   २५ ऑगस्ट रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या २० ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली

 शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची

राज्यातील युवक-युवतींना संधी

- मंत्री नवाब मलिक यांची माहिती

पुर्वतयारीसाठी आयोजित स्पर्धेत २२ हजार युवक-युवतींचा सहभाग

 

            मुंबईदि. 20 : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून, या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हाविभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद देत राज्यातील तब्बल २२ हजार ०९० युवक-युवतींनी यात सहभाग घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

            विविध ४७ क्षेत्रातील कौशल्यावर आधारित ही स्पर्धा होत आहे. सर्वाधिक २ हजार ११८ अर्ज इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशनसाठी आले असून ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीसाठी १ हजार २३१सीएनसी मिलिंगसाठी २६३सीएनसी टर्निंगसाठी ४७९इलेक्ट्रॉनिक्ससाठी १ हजार ०८६फॅशन टेक्नॉलॉजीसाठी ४५०हेल्थ आणि सोशल केअरसाठी ५४२आयटी नेटवर्क केबलसाठी ३१७मेकॅनिकल इंजिनिअरींगसाठी ३४४प्लंबिंग आणि ॲम्प हिटींगसाठी २९५रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगसाठी ३८४ तर वेल्डींगसाठी १ हजार ०११ युवकांनी कौशल्य सादरीकरणासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय ३डी डीजीटल गेम आर्टऑटोबॉडी रिपेअरऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीबेकरीब्युटी थेरपीब्रुकलेयींगकॅबिनेट मेकींगकार पेंटींगकारपेन्ट्रीक्लाऊड कॉम्पुटींगसीएनसी मिलींगकॉन्क्रींट कन्स्ट्रक्शन वर्ककुकींगसायबर सिक्युरीटीफ्लॉरिस्ट्रीग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजीहेअर ड्रेसिंगइंडस्ट्रीयल कंट्रोलज्वेलरीजॉईनरीलँडस्केप गार्डनिंगमेकॅट्रॉनिक्सप्लंबिंगप्रिंट मेडीया टेक्नॉलॉजीप्रोटोटाईप मॉडेलिंगरेस्टॉरंट सर्व्हीसवॉटर टेक्नॉलॉजीवेब टेक्नॉलॉजी आदी सेक्टरमधील आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी युवक-युवतींनी नोंदणी केली आहेअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अहमदनगर (८६३)अकोला (३८३)अमरावती (१ हजार ३३४)औरंगाबाद (६६१)बीड (१८८)भंडारा (३२८)बुलढाणा (803)चंद्रपूर (१ हजार ०४७)धुळे (४८३)गडचिरोली (२७६)गोंदीया (८५३)हिंगोली (६७)जळगाव (१ हजार ०६३)जालना (192)कोल्हापूर (३९२)लातूर (३५१)मुंबई (१ हजार ५२९)मुंबई उपनगर (५४)नागपूर (१ हजार ०५८)नांदेड (२२१)नंदुरबार (२९७)नाशिक (१ हजार २८६)उस्मानाबाद (२८४)पालघर (९९)परभणी (१०५)पुणे (१ हजार २७३)रायगड (२९८)रत्नागिरी (१३३)सांगली (420)सातारा (६४९)सोलापूर (770)सिंधुदूर्ग (१०३)ठाणे (१ हजार ४८४)वर्धा (१ हजार १३१)वाशिम (१६४)यवतमाळ (१ हजार ४४८) याप्रमाणे युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. २०२२ मध्ये शांघाय (चीन) येथे ही स्पर्धा आयोजित होणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ४७ क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्हाविभागराज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याची सुरुवात जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेच्या स्वरूपात १७ व १८ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाली. या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात विभागीय स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे. विभागीय विजेते उमेदवार 34 व 5 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. राज्यस्तरावरील विजेते उमेदवार डिसेंबर 2021 मध्ये बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र ठरतील. देशपातळीवर निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक टप्प्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेतअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            यापूर्वी जागतिक स्तरावरील ४५ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन कझान (रशिया) येथे करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होतात्यात महाराष्ट्रातून ७ आणि फ्युचर स्किलसाठी १ स्पर्धक अशा एकूण ८ स्पर्धकांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने एक सुवर्णएक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ठ सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून १३ व्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. तसेचमहाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ठ सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवक-युवतींना उत्कृष्ट संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

००००

 राज्यपालांच्या उपस्थितीत दृष्टिहीन स्नातकांचा पदवीदान सोहळा संपन्न

परफ्युम क्षेत्रातील दृष्टिहीन स्नातकांच्या यशाचा सुगंध सर्वत्र दरवाळावा : राज्यपाल

 

            मुंबई, दि. 20 : दृष्टिहीन विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांइतकेच प्रतिभावंत असतात. आज अनेक क्षेत्रांत दृष्टिहीन तसेच दिव्यांग विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशावेळी त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजे असे सांगताना परफ्युम क्षेत्रातील दृष्टिहीन स्नातकांच्या यशाचा सुगंध सर्वत्र दरवाळावा अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

            नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) द्वारा संचालित परफ्युमरी कॉलेजचा पहिला पदवीदान समारंभ शुक्रवारी (दि. 20) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व सीपीएल ऍरोमा कंपनी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला 2 वर्षांच्या सुगंधी द्रव्य पदविका’ अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 17 स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदविका प्रमाणपत्र देण्यात आली.

            ब्रेल लिपीचा शोध लागणे ही दृष्टिहीन व्यक्तींच्या उत्थानासाठी अतिशय महत्वाची घटना होती असे सांगून तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज अनेक क्षेत्रात दृष्टिहीन लोक आत्मनिर्भर झाले  आहेत.  सुगंधी द्रव्य क्षेत्राप्रमाणेच इतर अनेक क्षेत्रात दृष्टिहीन विद्यार्थी आपली क्षमता सिद्ध करतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. नॅब संस्थेच्या कार्याला मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.

सहानुभूती नकोसमान संधी हवी

            नॅब ही राष्ट्रीय संस्था नर्सरी ते वृद्धाश्रमापर्यंत सर्व वयोगटाच्या दृष्टिहीन लोकांसाठी काम करीत असल्याचे मानद सचिव सत्यकुमार सिंह यांनी सांगितले. राज्य शासनाने दृष्टिहीन लोकांसाठी शासकीय सेवांमध्ये ४ टक्के जागा राखीव ठेवाव्या तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये फिजिओथेरपिस्टचे किमान एक पद दृष्टिहीन व्यक्तींमधून भरले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  दृष्टिहीनांना सहानुभूती नको तर समान संधी हवी आहे असे त्यांनी सांगितले.

            संस्थेचे अध्यक्ष हेमंत टकलेमुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन व सीपीएल ऍरोमाजचे महाव्यवस्थापक रणजित अग्रवाल यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी सूत्र संचालन केले तर कौशल मिश्र यांनी आभार व्यक्त केले.

            यावेळी अमृता प्रदीप शिगवणऐश्वर्या नारायण ममदेविद्या बाबुलाल प्रजापती,  सिंधू प्रभाकर कल्लाटरोहीत अशोक विश्वकर्मा,  राज प्रकाश मकवानारितीक प्रवीण वैष्णवप्रमोद सुभाष पवारमाझ अहमद अन्सारी,  ओंकार रवींद्र कुल्येकौशिक गणेश रावराणेप्रशांत सदानंद विणेरकरहर्षवर्धन पांडुरंग हंबीरअनिल पाटील मयूरसुमित नामदेव मानकरफैसल मेहमूद मसानिया व  प्रिती किशोर  राऊत या विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

0000

 

 

 

Governor presides over

Convocation of Visually Impaired Students

 

 

          Mumbai, 20 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Convocation Ceremony of the NAB Perfumery College and presented Diploma Certificates to 17 Visually Impaired students at Raj Bhavan, Mumbai.

          The 2- year diploma programme in Perfumery was designed by NAB in association with the Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) and CPL Aromas Pvt Ltd.

          President of NAB India Hemant Takale, Vice Chancellor of YCMOU Prof. E. Vayunandan, General Secretary, NAB Satya Kumar Singh, General Manager of CPL Aromas Pvt. Ltd. Ranjit Agarwal and Executive Director of NAB Pallavi Kadam were present.

          The Governor presented the diploma certificates to Prajapati Vidya Babulal, Kallat Sindhu Prabhakaran, Vishwakarma Rohi Ashok, Makwana Raj Prakash, Vaishanav Ritik Pravin, Pawar Pramod Subhash, Ansari Mazz Ahmed, Kulaye Omkar Ravindra, Raorane Kaushik Ganesh, Vinerkar Prashnat Sadanand, Hambir Harshwardhan Pandurang, Mayur Anil Patil, Mankar Sumit Namdeo, Masania Faisal Mehmood, Raut Priti Kishore, Shivgan Amruta Pradip, Mamde Aishwarya Narayan.

0000



राजधानीत सद्भावना दिन साजरा

          नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी श्री गोयल यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी- कर्मचारी यांनी दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा

          महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी दिवंगत राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी  दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात

करण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय

                                                     - मुख्यमंत्री

·       सद् भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण

·       नागपूर व अमरावती विभागांना दोनशे लसीकरण वाहने

·       मिशन लसीकरण अभियानाला सुरुवात

 

            नागपूरदि. 20 :  कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असून कोरोनावर मात करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सद् भावना जीवनरथ दोनशे लसीकरण वाहनांच्या हस्तांतरण कार्यक्रम प्रसंगी केले.

            मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना जीवनरथ दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांच्या प्रमुख  उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            महापारेषण कंपनीतर्फे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 25 कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता सोसायटीला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या  निधीतून  विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी व्यासपीठावर ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री  डॉ. नितीन राऊतपशुसंवर्धन मंत्री सुनील केदारमहिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपेकौशल्य विकास मंत्री नवाब मलिकगृह राज्यमंत्री शंभूराज  देसाईरोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे,  इतर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआमदार राजू पारवेमहापालिकेचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवेविभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा,  जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला आदी उपस्थित होते.

            कोरोनासोबतच अतिवृष्टी व पुरासारख्या संकटाचा सामना करताना जनतेच्या संरक्षणाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीराज्यात 5 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. एका दिवशी 9 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले असून केंद्र शासनातर्फे जेवढे जास्त डोस उपलब्ध होतील त्यानुसार सर्वांना लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीतअशा नागरिकांचे घरी जावून लसीकरण करण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपयुक्त ठरणार आहेत. लसीकरणासाठी संपूर्ण मदत देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            लसीकरण वाहनांचे हस्तांतरण व मोहिमेचा शुभारंभ करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कीसद्भावना जीवनरथाच्या माध्यमातून विदर्भातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी लसीकरण वाहने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संत गाडगे महाराजांचा संदेश अंमलात आणून मेळघाटगडचिरोली यासारख्या अ‍तिदुर्गम भागात पोहचून  लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. ऊर्जा विभागाच्या दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्याचा देशातील व राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून राजीव गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच सद्भावना दिनी आयोजित होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

            आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेच्यासंदर्भात लसीकरण महत्त्वाचे असून जनतेला या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध केल्याबद्दल विदर्भ सहायता सोसायटी व महापारेषणचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचा प्रोटोकॉल तंतोतंत पाळला जाईल याची खबरदारी नागरिकांनी घ्यावीअसे आवाहन  केले.

            महिला व बाल विकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर म्हणाल्या, सद्भावनादिनी कोरोनावर मात करण्यासाठी तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ऊर्जा विभागातर्फे दोनशे वाहने उपलब्ध करुन दिलेत. ही खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांना श्रद्धांजली ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण वाढवण्याला या अभियानामुळे चालना मिळणार असे  त्यांनी सांगितले.

            पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी लसीकरणाचा वेग वाढविताना केंद्र शासनाने लसीचा पुरवठा वाढवावाअशी सूचना करताना शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याला ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देवून गौरव करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

            अध्यक्षीय भाषणात ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य विभागाला ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण अत्यंत आवश्यक असल्यामुळे महापारेषण कंपनीतर्फे 25 कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता समितीला उपलब्ध करुन दिल्यामुळे नागपूर व अमरावती विभागातील सर्व   तालुक्यांना प्रत्येकी दोन वाहने याप्रमाणे दोनशे वाहने देण्यात येत आहेत. या वाहनांचा  सुयोग्य वापर व्हावा तसेच वाहनाची देखभाल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियंत्रण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच लसीकरणासाठी    वापराचा नियमित अहवाल विभागीय आयुक्तांनी घ्यावाअशी सूचना ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी केली.

            प्रारंभी सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलीत करुन दोनशे सद्भावना जीवनरथाचे हस्तांतरण केले. नागपूर विभागासाठी 128 लसीकरण वाहनांचे हस्तांतरण विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी तर अमरावती विभागासाठी 72 लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महिला व बाल विकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांना करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी तर आभार जिल्हाधिकारी आर. विमला यांनी  मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त आशा पठाण यांनी केले.

            यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदीमाजी आमदार दिनानाथ पडोळे तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधीनागपूर व  अमरावती  विभागाचे  जिल्हाधिकारीवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi