Friday, 20 August 2021

 मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्याशिष्यवृत्तीवसतिगृहे तसेच

सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

 

            मुंबई, दि. 19 : मराठा समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली असूनअद्याप ती न्यायप्रविष्ट आहेआणि त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.

राष्ट्रपतीपंतप्रधानांना विनंती

            राज्य विधानमंडळाने देखील आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनेत योग्य ती सुधारणा करावी अशी शिफारस केंद्र सरकारला ठरावाद्वारे केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र देण्यात आले असून प्रत्यक्ष एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भेटले देखील आहे. 

कायम स्वरूपी नियुक्त्याचे शासन निर्णय जारी

            सन 2014 च्या ईएसबीसी अध्यादेशानुसार 14.11.2014 पर्यंत उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापर्यंत देण्यात आलेल्या नियुक्त्या कायम करण्याबाबत 5 जुलै,2021 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर निवड मंडळांना सूचना देणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे,

            सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास 9.9.2020 रोजी स्थगिती देईपर्यंत एसईबीसी वर्गातून शासन सेवेत केलेल्या नियुक्त्या कायम करण्याबाबत 15 जुलै,2021 रोजी शासन निर्णय काढला आहे.

            एवढेच नव्हे तर एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचा लाभ घेण्यासाठी अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरीता 10% जागा आरक्षित करण्याबाबत सुधारीत शासन निर्णय 31 मे,2021 रोजी काढला आहे.

            6 जुलै,2021 च्या शासन निर्णयान्वये पदभरतीकरीता सुधारीत बिंदुनामावली विहित केली आहे.

            सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण अथवा अराखीव (खुला प्रवर्ग) विकल्पाबाबत ईडब्ल्युएस प्रमाणपत्र व नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र देणेकरिता दि.6 जुलै,2021 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.

अधिसंख्य पदांबाबत विचार

            15 जुलै,2021 च्या शासन निर्णयानुसार जे उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहतील त्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मिळाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून अशा उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव विहित कार्यपद्धतीनुसार सादर करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या अन्य मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही

            राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2020-21 साठी मुळ अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये तंत्र शिक्षणाकरीता रू.600/- कोटी व उच्च शिक्षणासाठी रू.71.57 कोटी अशी एकूण र.671.57 कोटी तरतूद उपलब्ध करण्यात आलेली होती. तसेच आर्थिक वर्ष 2021-22 करीता योजनेसाठी रू.702/- कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. सन 2019-2020 मध्ये 36584 विद्यार्थ्यांना रु.69.88 कोटी इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली. सन 2020-2021 मध्ये 21550 विद्यार्थ्यांना रु.52.27 कोटी इतकीशिष्यवृत्ती देण्यात आली.

            डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभ  - ही वसतीगृह निर्वाह भत्ता योजना मराठा समाजासह खुल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लागू आहे. सन 2019-20 मध्ये 8484 विद्यार्थ्यांना रु.17.25 कोटी इतकी रक्कम निर्वाह भत्त्यापोटी देण्यात आली. सन 2020-21 मध्ये 1011 विद्यार्थ्यांना रु.2.43 कोटी इतकी रक्कम निर्वाह भत्त्यापोटी देण्यात आली. या योजनेसाठी आवश्यक तो निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल.

            डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह योजना -मराठा विद्यार्थ्यांसाठी 23 जिल्ह्यांमध्ये वसतिगृहे उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, सातारा (कराड), सांगली(मिरज), कोल्हापूर, नाशिक (2 वस्तीगृहे), औरंगाबाद(2 वस्तीगृहे),बीडलातूर, अमरावती व नागपूर या 14 ठिकाणी वसतिगृहांकरीता संस्था व इमारती अंतिम झाल्या असून या 14 वसतीगृहांचे लवकरात लवकर उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वसतिगृहांची एकूण प्रवेश क्षमता 2252 इतकी आहे.

एस.ई.बी.सी विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित 150 विद्यापीठांमध्ये शिक्षण

            सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते व त्यावर 40 कोटी रुपये खर्च करण्यात येतात. सामाजिक न्यायइतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामार्फत विविध प्रवर्गासाठी ज्या योजना राबविण्यात येतात. त्या धर्तीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक,‘सारथी’ यांनी आढावा घेऊन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सारथीमार्फत राबविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सारथी संस्थेला मजबूत करणे सुरु

            सारथी संस्थेचे उपकेंद्र कोल्हापूरला सुरु केले आहेमुंबईपुणेकोल्हापूरनाशिकऔरंगाबादलातूरअमरावती व नागपूर या 8 ठिकाणी विभागीय कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत.पुणे येथे ४१६३ चौ मी जमीन संस्थेला दिली असून ४२ .७० कोटी रक्कमेस बांधकामासाठी मान्यता दिली आहे.नाशिकऔरंगाबादनागपूरअमरावती येथील देखील जमिनीचे प्रस्ताव  सादर झाले आहेत. 

            चालू आर्थिक वर्षात सारथीला रू.150/- कोटी इतका निधी दिला असून विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्यात येईल.

            सारथी संस्थेकरीता कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नियमित स्वरुपाच्या व बाहययंत्रणेव्दारे भरावयाच्या पदांसाठी मान्यता दिली आहे.

2019-20 मध्ये सारथी मार्फत राबविलेल्या योजना-

पीएचडीएमफील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती

            सन 2019-20 मध्ये लक्षित गटातील Ph.D / M. Phil करणाऱ्या 501 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात आलीस्पर्धा परीक्षा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोग प्राथमिक परीक्षेसाठी 225 विद्यार्थ्यांना व राज्य लोकसेवा आयोग प्राथमिक परीक्षेसाठी 125 विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची रक्कम देण्यात आलेली आहे .IBPS अंतर्गत 586 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले,MESCO मार्फत 13 विद्यार्थ्यांना सैनिक पूर्व परिक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले. RTTC-BSNL Smart  City अंतर्गत 153 विद्यार्थ्यांनाप्रशिक्षण देण्यात आले.UGC-NET,SET परिक्षेसाठी 268 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

2020-21 मध्ये सारथी संस्थेमार्फत राबविलेल्या योजना

            केंद्रीय लोकसेवा आयोग प्राथमिक 2021परीक्षा- उतीर्ण झालेले सारथीचे 77 विद्यार्थी व इतर 165 असे एकूण 242 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु.50,000/- प्रमाणे एकूण रु.121लक्ष रक्कमेचे विद्यावेतन देण्यात आले आहे.

            मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 59 विद्यार्थ्यांना विद्यावेतनचे प्रत्येकी रु.25,000/- एकरकमी याप्रमाणे रु.14.75लक्ष अनुदान देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले.

            डिसेंबर 2020 मध्ये 251 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांचे नवीदिल्ली व पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत ऑनलाईन प्रशिक्षण जानेवारी2021ते जून 2021 या कालावधी मध्ये पूर्ण झाले व त्यांना आतापर्यंत रु 1.36लक्ष विद्या वेतन (Stipend) रक्कम देण्यात आले आहे.

            पोलीस भरती प्रशिक्षण: एकूण 7565 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण करिता नोंदणी केली आहे. CSMNRF-2020 साठी 342 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील 241 पात्र विद्यार्थ्यांना 23 ते 27 मार्चला मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. 207 विद्यार्थी मुलाखतीस उपस्थित होते व विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. यापैकी 192 विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत व त्यांची अंतीम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. मुलाखतीस उपस्थित राहू न शकलेल्या 34 विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यापैकी 11 विद्यार्थी हजर होते. उर्वरीत 23 विद्यार्थी फेरसंधी देऊनही मुलाखतीसाठी उपस्थित राहिले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाची छपाई

            सारथी संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाची 50 हजार प्रती छपाई करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. तसेच बालभारतीपुणे यांना या स्मृतीग्रंथाच्या छपाईसाठी देण्यात आलेल्या रु. 63 लक्ष या अग्रीम रकमेस वित्त विभागाकडून मान्यता मिळाली आहे. सारथी संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 50 हजार प्रती छपाई करण्याकरिता बालभारतीला आदेश देण्यात आले आहे. या ग्रंथाच्या 50 हजार प्रतींचे विविध शासकीय/निमशासकीय संस्थाग्रंथालयेग्रामपंचायतीस्थानिक स्वराज्य संस्थाशाळा/महाविद्यालये यांना विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे.

विविध परीक्षांचे नि:शुल्क प्रशिक्षण

            याशिवाय केंद्रीय नागरी सेवा स्पर्धा परीक्षा(UPSC-CSE) 2022 प्रशिक्षण,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत आयोजित दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (PSI,STI, ASO) परीक्षापुर्व नि:शुल्क ऑनलाईनप्रशिक्षणमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षणकर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत अराजपत्रित (Non Gazetted)पदाच्या स्पर्धा परीक्षापूर्व नि:शुल्क ऑनलाईन प्रशिक्षणमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा (CJJD & JMFC) नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमः

            15000 विद्यार्थ्यांना या वर्षी सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण देऊन त्यातील 70% विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावाअसा निर्धार सारथी संस्थेने केला आहे व त्या दृष्टीकोनातून कामकाज सुरु आहे.

            2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये विभागीय मुख्यालय असलेले जिल्हे प्रथम टप्यात घेण्यात येतील व त्यानंतर ही योजना इतर जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोर्स व प्रशिक्षण संस्था निवडून पाठविण्याबाबत सांगण्यात आले आहे.

तारादूत योजना

            तारादुतांची नियुक्ती करून लक्षित गटासाठी सारथी आणि राज्य शासनाच्या संबंधित योजना राबविण्यात येण्याचे ठरले असून त्यासंदर्भात नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला आहे. 

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ -अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सन 2018 पासून रु.1825 कोटी इतक्या निधीचे वाटप केलेले असून महामंडळास आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आतापर्यंत 27 हजार 924 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.तसेच रु.134.26कोटी रुपयांची व्याज प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. कृषिदुग्धविकासट्रॅक्टरट्रक व इतर व्यवसायांसाठी कर्जवाटप करण्यात आले आहे.

            कोपर्डी प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयात अपील प्रलंबीत आहे. कोरोना काळानंतर दि.2 ऑगस्ट,2021 पासून उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. याबाबत उच्च न्यायालयामध्ये महाधिवक्ताशासकीय अभियोक्ता यांनी हे प्रकरण त्वरीत सुनावणीसाठी घेणेबाबत विनंती करण्यास सांगण्यात आले आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांच्या १४ वारसांना नोकरी

            एस.टी.महामंडळात 14 वारसांना नियुक्त्या देण्यात आल्या असून 8 सेवेत रूजू झाले आहे. 6 वारस काही अवधीनंतर रुजू होणार आहे.3 वारसांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नाही. 11 वारस निकषांत बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी निकष शिथिल करण्याचा प्रस्ताव महामंडळाने शासनास सादर केला आहे. त्यावर शासनामार्फत लवकरच निर्णय घेण्यात येईल. 5 वारसांनी इतर कारणांस्तव आत्महत्या केल्या असल्यामुळे ते नोकरी देण्यास पात्र ठरत नाहीत. 5 वारसांनी महामंडळातील नोकरी नाकारली आहे. 2 वारसांबाबत जिल्हाधिकारी व पोलीस विभागाचा अहवाल प्रलंबित आहे. 1 वारसाने नोकरीसाठी अद्याप अर्ज केलेला नाही.

आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या १७ कुटुंबियांना आर्थिक मदत-

            मृत्यूमुखी पडलेल्या 17 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य प्रदान करण्यात आलेले आहे. उर्वरीत वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सत्वर मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

            आंदोलकांवरील 199 खटले न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आले आहेत. 109 खटले मागे घेण्याची विनंती संबंधित न्यायालयाकडे विचाराधिन आहे. 16 प्रकरणात आरोपींनी नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात आलेले नाहीत.           

००००


 नवाझ मोदी सिंघानिया, शायना एनसी यांसह ५० करोना योद्धे सन्मानित

“निःस्वार्थ सेवा करून मातृभूमीचे ऋण फेडावे”: राज्यपाल

भारतीय समाजात दान, पुण्य व सेवा कार्याला फार महत्व आहे. सेवा परमो धर्म: असे आपल्या देशात मानले जाते. या सेवाभावामुळे करोना काळात तसेच अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शासकीय, अशासकीय संस्थांसह सामान्य नागरिकांनी विलक्षण कार्य केले.  प्रत्येकाने अशीच अधिकाधिक निःस्वार्थ सेवा करून मातृभूमीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.  

करोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० करोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जय फाऊंडेशन व रुद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, महाराणा प्रताप महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह ठाकूर तसेच जय फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोदिया प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते नवाझ मोदी सिंघानिया, शायना एनसी, डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, समाजसेवक तसेच इतर करोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.

Nawaz Mody Singhania, Shaina NC, 50 Frontline Corona Warriors felicitated by Governor

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Frontline Warrior awards to 50 Corona Warriors from different walks of life at Raj Bhavan, Mumbai on Thursday (19th Aug).

Nawaz Mody Singhania, Shaina NC, doctors, police officers and police personnel and social workers were felicitated by the Governor. The felicitation was organised by Jay Foundation and Rudra Pratishthan.

MLA Sanjay Kelkar, former MP Sanjeev Naik, President of Maharana Pratap Mahasangh Amar Singh Thakur and Trustee of Jay Foundation Dhananjay Singh Sisodiya were present on the occasion.


--

Thursday, 19 August 2021

 न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ

 

            मुंबई, दि. 19 : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली.

            राजभवन येथे गुरुवारी (दि.19) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली.

            शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवारराजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमहापौर किशोरी पेडणेकरमुख्य सचिव सीताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडेराज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रियउपलोकायुक्त संजय भाटियामुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशवरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

            न्या एम एल तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये संपल्यापासून हे पद रिक्त होते. 

            सुरुवातीला राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी न्या. कानडे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. शपथ ग्रहण सोहळ्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

            दिनांक २२ जून १९५५ रोजी जन्मलेल्या न्या. कानडे यांनी सन १९७९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली. न्या. कानडे यांची दिनांक १२ ऑक्टोबर २००१ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.  दिनांक २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१५ या कालावधीत व त्यानंतर १५ जानेवारी ते २० जानेवारी २०१६ या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते.

            न्या. कानडे यांनी आपल्या कारकिर्दीत ३४००० प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा केला असून त्यांनी दिलेले १२०० पेक्षा अधिक निकालांचा विधी अहवालांमध्ये उल्लेख केला गेला आहे.

******************

 

Justice Vidyasagar Kanade sworn in as Maharashtra Lokayukata

 

      Justice Vidyasagar M. Kanade, former Judge of the Bombay High Court was sworn in as the new Lokayutka of Maharashtra on Thursday (19th August).

       Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari administered the oath of office to Justice Kanade at a brief oath taking ceremony held at Raj Bhavan, Mumbai.  Justice Kanade succeeds Justice M L Tahaliyani whose term as Lokayukta ended in August 2020.

       Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister of Protocol and Environment Aaditya Thackeray, Mayor of Mumbai Kishori Pednekar, Chief Secretary Sitaram Kunte, Director General of Police Sanjay Pande, Chief Commissioner of Right to Services Swadhin Kshatriya, Upa Lokayukta Sanjay Bhatia, judges of the Bombay High Court and senior government officers were present. 

      Principal Secretary to the Governor Santosh Kumar read out the Warrant of appointment of Justice Vidyasagar Kanade. The oath taking ceremony started and concluded with the singing of the National Anthem

       Justice Kanade (born on 22nd June 1955) started practising in the High Court, Bombay in June 1979.

      He worked as Assistant Government Pleader from 1988 to 1990 in Writ Cell. He was a High Court Panel Counsel for Union of India from 1986 to 1989 and ‘A’ Panel Counsel for State of Maharashtra from 1992 to 2000. He appeared on behalf of various Government Corporations.

       On 12th October 2001 Justice Kanade was elevated as High Court Judge. He was Chairman of the Governing Council of the Government Law College. Justice Kanade was Acting Chief Justice of the Bombay High Court from 2nd December 2015 to 9th December 2015 and again from 15th January 2016 to 20th January 2016. 

      As a judge of the Bombay High Court, he delivered more than 34,000 judgments. More than 1200 judgments given by him are reported in Law Reports.  Justice Kanade was appointed as an Administrator of the Maharashtra Cricket Association from 11th March 2018 to 15th September 2018.

**

 आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करुन

पालघर जिल्ह्यातील विकासकामे करावीत

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       पालघर येथील नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

·       लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य देऊन नविन इमारतीचा नावलौकिक वाढवावा

 

            पालघर, दि. 19 :- जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिक स्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी संस्कृती व जिल्ह्यातील परंपरा यांचे जतन करून विकासकामे करावीत. नविन इमारतीचा नावलौकिक वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            नविन सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा परिषद कार्यालयपोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नविन सुसज्ज इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

            यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (ऑनलाईन)महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (ऑनलाईन)नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेमहसुल व ग्रामविकास मंत्री अब्दूल सत्तारपालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाणखासदार राजेंद्र गावीतसर्वश्री आमदार श्रीनिवास वनगासुनिल भुसाराराजेश पाटीलविनोद निकोलेरविंद्र पाठकमुख्य सचिव सिताराम कुटे(ऑनलाईन)कोकण विभागीय आयुक्त विलास पाटीलसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जीकोकण परिक्षेत्र  उपमहानिरिक्षक संजय मोहितेसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदेजिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठपोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे म्हणाले, जिल्ह्याला सागरीडोंगरी भूभाग लाभला असल्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असतो. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यामध्ये नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदतवाटपाचे काम सुरू आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेल्या उपाययोजनामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्स‍िजन प्रकल्प उभारला आहे. ऑक्स‍िजन बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पालघर जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला व परंपरेला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे. जिल्ह्यामध्ये वनसंपदा आहे. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाचे फळ चिकु सातासमुद्रापार गेले आहे. वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. या सर्व घटकांना गती देऊन जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी. जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील उद्योग वाढावेत यासाठी उद्योजकांना विविध सवलती देऊन गुंतवणुक करण्यास उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल.

            पावसाची परिस्थिती असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रात गेलेले मच्छिमार यांना परत समुद्रकिनारी आणल्याने जिल्हा प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे जिवितहानी टाळता आली.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात नविन इमारतीचे लोकार्पण होत आहे. ही बाब अभिमानास्पद असून नविन इमारतीत येणाऱ्या नागरिकांची कामे तात्काळ होतील अशी दृढ इच्छा आपण मनामध्ये बाळगली तर ही भव्य सुसज्ज इमारत देशामध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            जिल्हा प्रशासनामार्फत पालघर जिल्ह्यात एकूण 13 शिवभोजन केंद्र मंजूर असून त्यापैकी सद्यस्थितीत 9 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या शिवभोजन केंद्रातून सध्या प्रतिदिन 3000 थाळी मोफत शिवभोजन केंद्रावर लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत आजपर्यंत 9,10,771 थाळयांचा लाभ लाभार्थ्यांनी घेतलेला आहे. या योजनेस पालघर जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नविन वास्तुमध्ये काम करताना नागरिकांच्या गरजांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. नविन वास्तू जनतेच्या सेवेसाठी असल्याने अधिकारी व नागरिकांमधील बांधिलकी टिकणे महत्त्वाचे आहे. जव्हार येथिल राजवाड्याच्या कलाकृतीवरून सिडकोने निर्माण केलेली जिल्हा प्रशासनाची ही भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. अशी शासकिय कार्यालयाची वास्तू संपूर्ण देशात नाही. या वास्तूमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व समाजघटकांना समान न्याय देऊन जिल्ह्याचा विकास साधावा. या वास्तूमुळे जिल्ह्याच्या विकासांना चालना मिळेल असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला.

            कृषीमाजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जिल्ह्यामध्ये नविन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याने विकासाच्या नविन पर्वाला सुरूवात झाली आहे.

            प्रशासकीय इमारतींमध्ये साधारणत 60 जिल्हास्तरीय कार्यालये स्थापीत होणार आहेत. आज रोजी पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 41 शासकीय कार्यालये स्थापन झाली असूनउर्वरित 23 विभागांची कार्यालये लवकर स्थापन होणे आवश्यक आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनआदिवासी विकास भवनमहिलांसाठी One Stop Centre यांचेकरिता जागा उपलब्ध करून देवून या इमारतींचे बांधकाम येत्या 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

            मौजे टेंभोडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागास 2 एकर जागा देण्यात आली आहे. मौजे सरावली येथे सुसज्ज ग्रामीण रूग्णालय बांधण्याकरीता 1.5 एकर जागा प्रदान करण्यात आली आहे. JSW कंपनी CSR निधीमधून यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून देणार आहे. मौजे उमरोळी येथे जिल्हा कारागृहासाठी 25 एकर जागाग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रास (RSETI) 2 एकर जागा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयास 5 हेक्टर (12.50 एकर) जागा प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये "स्त्री रुग्णालय" स्थापन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 5 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            स्थानिक खेडाळूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी मौजे टेंभोडे येथे 16 एकर जागेमध्ये राष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रिडासंकुल विकसित करण्यात येत आहे. मौजे अल्याळी येथे 4 एकर जागा क्रिडांगणाकरीता पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. मौजे अल्याळीनवलीटेंभोडे येथील तलाव व पालघर शहरातील गणेश कुंड बगीचा क्षेत्र विकास करण्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात 3 व्यक्ती मृत्यू व 4 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. 14350 शेतकऱ्यांचे 6100 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके/ फळपिकांचे नुकसान झालेले आहे. 95 घरांचे पूर्णत: तर 14312 घरांचे अशंत: पडझड होऊन नुकसान झालेले आहे. तसेच 53 बोटींचे नुकसान झाले असूननुकसानीसाठी शासनाकडून विशेष दराने मदत जाहिर करून जिल्ह्याला 51 कोटी 51 लाख इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे आभारही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मानले.

****

 .*#रियुनीयन#*


लंडनच्या इस्ट एंड ला केबल स्ट्रीट वर असलेले ते शंभरी पार केलेले रेस्टोरेन्ट कम बार. नाव होते 'पॉल्ज लाउंज'. तसा हा लंडनचा लो-मार्केट असलेला भाग. जास्त करून लंडनचा कामगार वर्ग व मध्यम वर्ग यांनी व्यापलेला. तिथे हे रेस्टॉरंट गेली ११० वर्षे अव्याहतपणे चालू कसे राहिले हेच खरेतर आश्चर्य होते. 


साहजीकच होते. इस्ट एंडचे बहुतेक सारे जुने  पब, बार व रेस्टॉरंट जाउन आता त्यांच्या जागा केएफसी, मँकडोनल्ड्स, पिझ्झा एक्सप्रेस, स्टारबक्स यासारख्या विदेशी मल्टीनैशनल कंपन्यांच्या आउटलेट्सनी घेतली होती. हे रेस्टॉरंट मात्र शतक पूर्तीनंतरही अद्याप टिकून होते.


आज या रेस्टॉरंट चे एक टेबल दुपारच्या बारा वाजता रिझर्व होते. ते ज्यांच्यासाठी आरक्षित होते ते एकेकजण बाराच्या आसपास  येउ लागणार होते. 


रिचर्ड टैक्सी मधून आला. एका हातात एक मोठी कैरी बैग व दुस-या हातात काठी टेकत तो रेस्टॉरंट मधे शिरला. रेस्टॉरंट चा हेड वेटरने समोर येउन त्यांचे स्वागत केले. 


त्याने आदराने रिचर्डला विचारले. 

'माफ करा...आपण 65 इयर्स रियुनीयन साठी आले आहात का?' 


'होय..अगदी बरोबर. माझे मित्र आधीच आलेत का?' त्याने उत्सुकतेने विचारले. 


'नाही..ते अद्याप आलेले नाहीत. बहुधा येतच असतील. आपण या टेबलवर बसून घ्यावं.' 


रेस्टॉरंट च्या मध्यभागी लावलेल्या एकमेव टेबलवर रिचर्डला बसवून त्याने खुणेने आपल्या सहकारी वेटर्सना त्यांना हवे नको पहायला सांगितले व तो स्वतः इतर येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बाहेर येउन थांबला. रिचर्डला हायसे वाटले. "चला मी पहिला आलोय म्हणजे बिल देण्याची जबाबदारी माझी नाही". 


हो..तसे रियुनीयन  एग्रीमेंट त्यांच्यात झाले होते..पन्नास वर्षापूर्वी. रिचर्ड नकळत भूतकाळात गेला..पन्नास वर्षे मागे..


चार मित्र होते ते. अगदी जवळचे मित्र. 

टिमोथी, स्टुअर्ट, इयान आणि रिचर्ड. इस्ट एंडच्या फार्लींग्टन  स्कूल मधून १९७१ मधे आपले हायस्कूलचे शिक्षण घेउन बाहेर पडणारे चार विद्यार्थी. आपल्या हायस्कूल पासींगची पार्टी करण्यासाठी,  तेंव्हा पूर्ण इस्ट एंड मधे आपल्या जेवणाच्या चवीसाठी प्रसिद्ध  असणारे 'पॉल्ज लाउंज' हे बार रेस्टॉरंट त्यांनी निवडले. 


त्यादिवशी 'पॉल्ज' मधे प्रत्येकाने शैंपेन चाखत आपण पुढे काय करणार हे आपल्या इतर मित्रांबरोबर शेअर केले. 


टिमोथीला त्याच्या घरचे,  अमेरिकेला एम.आय.टी ला इंजीनियरिंग च्या उच्च शिक्षणासाठी पाठवणार होते. तिथून परत आल्यावर त्याला घरचा इंजिनियरिंग मधलाच मोठा बिझनेस सांभाळायचा होता. 


स्टुअर्टला कुकींग मधे रस असल्याने तो इटली, स्पेन, जर्मनी ला जाउन तिथल्या कुकींग व जेवणातील पदार्थांच्या नवीन ट्रेंड्स शिकून घेणार होता. तीन चार वर्ष बाहेर राहून तो परत येउन आपले स्वतःचे रेस्टॉरंट सुरु करणार होता. 


इयानला पोलीस दलात जायचे आकर्षण होते.  लॉ ची पदवी किंग्ज कॉलेज मधून घ्यायची व मेट पुलीस अर्थात स्कॉटलंड यार्ड मधे भरती व्हायचे हे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याची सारी तयारी चालू होती. 


रिचर्ड मात्र आपले ध्येय सांगताना थोडा चाचरत होता. आपल्या मित्रांचे जीवन उददेश्य ऐकून तो आधीच थोडा दडपला होता. त्याने आपल्या मित्रांना सांगितले की घरच्या जेमतेम परिस्थिति मुळे त्याला पुढे उच्च शिक्षण घेणे जमणार नव्हते. त्यामुळे कॉलेज वगैरे स्वप्न विसरुन वडिलांना त्यांच्या बेकरीच्या व्यवसायात मदत करणे त्याला भाग होते. 


त्या दिवशी सर्वांनाच लक्षात आले की आता सर्वांच्या वाटा वेगळ्या होताहेत. पुढे आपापल्या नव्या क्षेत्रात गढून गेल्यावर यापुढे त्यांची भेट होइल की नाही,  अन झाली तर कधी,  हे कोणालाच सांगता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी चौघांमधे एक एग्रीमेन्ट केले. आजपासून पन्नास वर्षांनी म्हणजे वयाच्या 65 व्या वर्षी, याच दिवशी  ते चौघे पुन्हा याच 'पॉल्स लाउंज'  रेस्टोरंट मधे दुपारी बारा वाजता परत भेटतील. 


चौघांमधे सर्वात जो उशीरा येइल तो त्या रियुनीयनचे बील देइल अशी गंमतशीर अटही त्या एग्रीमेंट मधे त्यांनी टाकली होती. आजच तो दिवस होता जेंव्हा पन्नास वर्षांनी ते चौघे परत भेटणार होते. 


रेस्टॉरंट च्या बाहेर एक लैंडरोवर गाडी येउन थांबली अन त्यातून इयान उतरला. त्याने गाडीची चावी व्हैले कडे दिली व तो रेस्टोरंटच्या दिशेने चटचट चालत आला. पोलीस सुपरीटेंडेंट म्हणून पाच वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावरही त्याने आपला फिटनेस चांगला ठेवला होता. कुठूनही तो पासष्ट वर्षांचा म्हातारा वाटत नव्हता. 


हेड वेटर त्याला टेबलशी घेउन आला तसा रिचर्ड उठून उभा राहिला व गळाभेट घेत त्याने इयानचे स्वागत केले. दोघे मित्र लंडनमधे असले तरी ब-याच काळाने, कदाचित तीस एक वर्षांनी भेटले होते. 


हेड वेटरने पन्नास वर्षे जुनी फ्रेंच वाईन टेबलवर आणून ठेवली. ती महागाची वाईन बॉटल बघून रिचर्डच काय पण इयानदेखील चरकला. पोलीस खात्यात वरच्या हुद्दयावर असतानाही इतकी उंची वाईन तो कधी प्यायला नव्हता. 

त्या दोघांच्या चेह-यावरचे भाव वाचत हेड वेटर चटकन म्हणाला


'सर..ही वाईन कॉम्पलीमेंटरी आहे या रेस्टॉरंटच्या मालकांकडून. पन्नास वर्षांनी चार मित्र आमच्या रेस्टॉरंट मधेच परत भेटताहेत हा साधा योग नाही. आमच्यासाठीही ही अभिमानाची गोष्टच आहे.' 


'ठीक आहे..तुमच्या मालकांना धन्यवाद सांगा. बाकी दोघे मित्र आले की मग ही बॉटल उघडूत' इयान म्हणाला. 


तो पुढे काही विचारणार इतक्यात पोर्चमधे कार थांबल्याचा आवाज आला..व 'एक्स्क्युज मी' असे म्हणत हेड वेटर तिकडे धावला. 


बाहेर एक आलिशान  लिमोझीन गाडी उभी होती. ड्रायवरने पटकन मागे येत कारचा मागचा दरवाजा उघडून धरला व लिमोझीन मधून टिमोथी उतरला, नव्हे 'सर टिमोथी' उतरले. 

दोनच वर्षांपूर्वी इंग्लंडच्या राणीने बकिंगहम पैलेस मधे इतर मान्यवरांबरोबर टिमोथीला  नाईटहूड प्रदान केले,  व तो सर टिमोथी झाला. 


त्याला रुबाबात आत येताना पाहून इयान आणि रिचर्ड दोघांची छाती दडपली. एकेकाळी आपला मित्र असला तरी आज तो ब्रिटन मधल्या टॉप पाच उद्योगपतींपैकी एक होता व आता त्याला नाईटहूड मिळाली होती. त्यामुळे त्याच्याशी वागता बोलताना आब सांभाळूनच वागावे लागणार होते. 


पण झाले वेगळेच. मित्रांसमोर येताच स्वतः टिमोथीने मोठेपणाचे सगळे संकेत झुगारुन,  फेकून दिले,  व अत्यानंदाने दोन्ही मित्रांना घट्ट आलिंगन दिले. मोठ्या पोझीशनवरील लोकांना जवळचे मित्र नसतात. ख-या मित्रांसाठी ते नेहमीच तरसतात हे वाक्य इयान व रिचर्डला आज  पटले. 


आता तिघे मित्र एकत्र आले तसे गप्पांचा फड रंगला. एकमेकांची व तिघांच्या कुटुबियांची चौकशी झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अर्थात अजून स्टुअर्ट यायचा होता.


 पण तेवढ्यात हेडवेटरनी येउन सांगितले की स्टुअर्ट यांना यायला थोडा वेळ होइल तरी त्यांनी त्याच्यासाठी न थांबता सुरवात करावी. 

'अच्छा, म्हणजे स्टुअर्टला आजचे बिल द्यायची संधी मला द्यायची नव्हती तर...त्यासाठी एवढा खटाटोप' असे टिमोथीने म्हणताच तिघेही हसले. 


वाईनची बॉटल उघडली गेली व ती पन्नास वर्षे जुनी विंटेज वाईनचे ग्लास हातात घेत तिघांनी चियर्स म्हंटलं..


'टू फिफ्टी इयर्स ऑफ फ्रेंडशीप' टिमोथीने टोस्ट केले व बाकी दोघांनी त्याला दुजोरा दिला. 

गप्पा मारत वाईन व रेस्टोरंट मधून त्यांनी ऑर्डर केलेले उंची पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी आपला फर्स्ट कोर्स पूर्ण केला. 

अजूनही स्टुअर्टचा पत्ता नव्हता.


 वाईनची बाटली संपली तरी स्टुअर्ट अजून आला नव्हता त्यामुळे नाईलाजाने त्यांना मेन कोर्स ऑर्डर करावा लागला. टिमोथीला नंतर एक बोर्ड मिटींग असल्याने स्टुअर्टसाठी अजून थांबणे  शक्य नव्हते. 


हेड वेटरने त्यांना त्या दिवसाच्या स्पेशल मेनू बद्दल सांगितले. यातल्या ब-याच डिशेस तिघांच्या आवडीच्या होत्या. हा योगायोग समजून त्यांनी त्या डिशेस ऑर्डर केल्या. गप्पा मारत, हास्य विनोद करीत त्यांनी मेन कोर्स पूर्ण केला.


 आजवरचे सर्वात आठवणीत राहील असे लंच त्यांनी पूर्ण केले. सर्वात शेवटी आपल्या कैरी बैगमधून  आणलेले एक स्पेशल केक रिचर्डने भित भित काढून समोर ठेवले. त्यावर 'फिफ्टी इयर्स ऑफ फ्रेंडशीप' असे लिहीले होते. तो केक पाहून इयान व टिमोथी खूश झाले. 


 स्टुअर्ट येण्याची आशा आता मावळली होती. त्याची भेट होउ शकली नाही ही खंत तिघांना लागून राहिली होती. तिघांनी मिळूनच  केक कापला.  रिचर्डने स्वतःच्या हातांनी बनवलेला तो केक..ज्याने या मित्रांच्या पुनर्भेटीची गोड सांगता झाली. केक खाउन रेस्टोरंटमधल्या सर्वांना वाटण्यात आले.  


टिमोथीने हेड वेटरला बिल मागितले. तसे तो हसला..

'सर टिमोथी, बिल तर पेड झालय..'


'पेड झालय? पण कोणी केले?' टिमोथीने आश्चर्यचकित होत.विचारले. तेच भाव इतर दोघांच्या चेह-यावर होते.


'तुमचे मित्र स्टुअर्ट यांनी..' 


'पण तो तर आलाच नाही..मग कसे पेड केले..'


'माफ करा..सर टिमोथी..पण आजच्या काळात बिल पे करायला प्रत्यक्ष यायची गरज कुठे भासते?'


'तेही बरोबरच आहे'  इयान म्हणाला..मग आपल्या मित्रांकडे वळत तो म्हणाला 'पण मग स्टुअर्टला यायचंच नव्हतं तर हे बिल देण्याची तर काय गरज होती?' 


तेवढ्यात बाहेर कार थांबल्याचा आवाज आला. 

'चला...शेवटी तरी स्टुअर्ट वेळ काढून आला वाटतं'  असे समजून ते तिघे खूश झाले. पोर्चमधून आत येणा-या पावलांची चाहूल घेत ते तिघे दरवाज्याकडे एकटक श्वास रोखून पहात होते. 


अन..तो आत आला...अन ते तिघे डोळे फाडून त्याला पहातच राहिले. समोर स्टुअर्ट हसत उभा होता. 


"हो स्टुअर्टच...पण बापरे..हा इतका तरुण..अगदी चाळिशीतला कसा दिसतोय...? याचे वयच वाढले नाही की काय?" तिघांच्या मनात एकाच वेळी हा विचार आला.


'तो'  हसला. त्या तिघांजवळ येत तो म्हणाला..

'मला ठाउक आहे..तुम्हा तिघांच्या मनात काय प्रश्न आहे? तुमचा स्टुअर्ट इतका तरुण कसा काय? बरोबर?' 


तिघेही काही बोलले नाही. काय चाललय हे तिघांना ही कळत नव्हते. 


' सांगतो..सारा उलगडा करतो. मी तुमच्या मित्राचा,  स्टुअर्टचा मोठा मुलगा, टेड. मी आज माझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करायला इथे आलोय'.


टेडचे हे बोलणे ऐकून तिघांच्या पायाखालची जमीनच हादरली. रिचर्डने थरथरत्या हाताने आपल्या दोन्ही मित्रांचा आधार घेतला. दोघांनी त्याचा हात घट्ट पकडला. 


टेड पुढे म्हणाला

' पप्पा..सहा महिन्यापूर्वी गेले..प्रोटेस्ट कैंसर. खूप इच्छा होती त्यांची की तुमचे हे रियुनीयन करेपर्यंत त्यांना आयुष्य मिळावं..पण देवाच्या मनात ते नव्हतं. मृत्यु जवळ आला तेंव्हा पप्पांनी मला बोलवून सांगितले की त्यांच्याऐवजी या रियुनीयन मधे मी त्यांना रिप्रेजेंट करावं. आजच्या दिवशी तुम्हा मित्रांच्या भेटीत कसलाही गोंधळ नको म्हणून सहा महिने आधीच आजचा पूर्ण दुपारसाठी हे रेस्टॉरंट मला त्यांनी  बुक करायला सांगितले होते. 


खूप आठ्वण काढायचे तुमच्या हायस्कूल च्या दिवसांची. तुमच्या गंमती जमती, मस्ती, गर्लफ्रेंड्स, सगळे आठवत रहायचे. त्यांना या रियुनीयनमधे ते क्षण पुन्हा जगायचे होते.' 


टेडने हसत हसत आपले डोळे पुसले.  


'खरंच अतीव इच्छा होती पप्पांना तुम्हाला भेटायची. म्हणून मला त्यांनी मृत्यु आधी सांगितले होते "माझ्या तिन्ही मित्रांना भेटशील तेंव्हा त्यांना माझ्यावतीने  घट्ट मिठी मार".  असे समजा की त्यांची हीच शेवटची इच्छा पूर्ण करायला मी आलोय' 


टेडचे हे बोलणे ऐकून तिन्ही मित्रांना अश्रु अनावर झाले. ते तिघे टेडजवळ आले. तिघांनी टेडला घट्ट अलिंगन दिले. त्यांच्या अश्रुंनी टेडचे खांदे भिजुन गेले. 


टेडला मिठी मारताना तिघांनाही मिटलेल्या डोळ्यांसमोर आता आपला पंधरा वर्षांचा स्टुअर्टच दिसत होता. 


ख-या अर्थाने आता त्यांचे  'रियुनीयन' पार पडले होते. 


🌹🌹

 आपल ते सोनं पण ओळखणार कोण..?🤔


👉 *खोबरेल तेल*


खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे..! 


माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले ! 


कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ....! 


तुमच्यासाठी ख़ास डॉ मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!!


"कोकोनट ऑइल"

गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत.


दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आत्ता महत्त्व आलेले आहे.


अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या, असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला.


अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची.


कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो.


डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.


इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.


ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले.


१९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला.


यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.


माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल. 

परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची,  केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची,  कातडीत चरबी होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची,  कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची...

सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. 

ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते.


सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मी ही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत.


*डॉ. मीना नेरूरकर....*


खूपच माहितीप्रद ,ऊपयुक्त लेख वाटल्याने फाॅरवर्ड केला आहे ..

 _*Laugh till you fall 😀😀😀😀😀😀*_


_*✨Mental Venkat*_


_Venkat went  to a bank to open a S.B.  A/C._

_After seeing the Form he went to Delhi for filling it up._

_You know why?_

_Form said: 'Fill Up In Capital.'_

😀

    

_Venkat standing below a tube light with open mouth._

_Why?_

_Because his doctor advised him: 'Today's dinner should be light !'_

😃


_On romantic date Venkat  girl friend asks him:_

_'Darling ! On our engagement will you give me a ring?'_

_He said: 'Sure ! What's your phone no.?'_

😀


_Venkat found the answer to the most difficult question ever._

_What will come first, chicken or egg?_

_What ever u order first will come first._

😀


_Teacher told all students to write an essay on a cricket match._

_All were busy writing except Venkat_ 

_He wrote:'Due To Rain, No Match!'_

😀


_What does Venkat  do after taking a Xerox?_

_He will compare it with the original for any spelling mistakes._

😀


 _Venkat & wife buy coffee in a shop._

_Venkat: Drink quickly before it gets cold._

_Wife: Why?_

_Venkat: Hot coffee $5 and cold coffee $10._

😀


_What happens when  Venkat  wife delivers twins????_ 

_He does not sleep whole night, thinking who is the father of second child...😝_


_Manager asked Venkat  at an interview._

_Can you spell a word that has more than 100 letters in it?_ 

_Venkat replyed: -P-O-S-T-B-O-X._

😃


_After returning back from a foreign trip, Venkat  asked his wife,_

_Do I look like a foreigner?_

_Wife: No! Why?_

_Venkat: In London a lady asked me Are you a foreigner?_

😁😉

 

_Lecturer: write a note on Gandhi Jayanthi_

 _Venkat writes, "Gandhi was a great man, but I don't know who is Jayanthi._

😖😠


_Interviewer: just imagine you are on the3rd floor, it caught fire and how will you escape?_

_Venkat: its simple. I will stop my imagination!!!_

😝😜✌


_Friend: I got a brand new Ford IKON for my wife!_

_Venkat: Wow!!! That's an unbelievable exchange offer!!!_

😘😍


_Teacher: "What is common between JESUS, KRISHNA , RAM, GANDHI and BUDHA?"_

_Venkat : "All are born on government holidays...!!!_

😭😂✨


_Sir: What is difference between Orange and Apple?_

_Venkat : Color of Orange is orange, but color of Apple is not APPLE_

👏✋😜😝✨


_Do not laugh alone.. Just pass to your groups._

Featured post

Lakshvedhi