Thursday, 19 August 2021

 पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

·      ७०० जणांनी घेतले प्रशिक्षण

 

            मुंबईदि. 19 : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेतअसे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.           

            यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणितपरवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व  पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडेपर्यटन संचालनालयमहाराष्ट्र शासनमुंबई यांच्याशी ०२२-६२९४८८१७ या क्रमांकावर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.            

            केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससीएसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबारवाशिमगडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षीत जिल्ह्यांचे अधिवासीत रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे.           

            उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि १८ ते ४० वयोगटातील असावा. उमेदवार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावेअशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेतअसे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

 उपमुख्यमंत्र्यांनी साधला औसा शहरवासियांशी ऑनलाईन संवाद

गौरवशाली परंपरा असणाऱ्या औसा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

औसा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

 

            मुंबईदि. 19 : समृद्धगौरवशाली इतिहास असणाऱ्या औसा शहराचे भविष्य अधिक उज्ज्वलसमृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्रीअर्थमंत्री  म्हणून औसावासियांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथसहकार्य असेल. औसा नगरपरिषदेला शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

            औसा शहरातील विविध विकास कामांचे नुकतेच उद्धाटन झाले. यानिमित्त उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी आज देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून लातूर जिल्ह्यातील औसा शहरवासियांशी ऑनलाईन संवाद साधला. कार्यक्रमास औसा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेखउपनगराध्यक्षा श्रीमती किर्ती कांबळेमाजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशीपाणीपुरवठा सभापती गोविंदराव जाधवमुख्याधिकारी वसुधा फडसुलेमान शेखपठाण वलिखाँन्जीऔसा नगरपरिषदेचे नगरसेवकनगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारीनागरिक उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणालेऔसा शहरवासियांसाठी विकासकामांचा डोंगर उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट क्रांतिदिनी औसा-माकणी पाईपलाईन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पणशिवकालीन मराठा भवनाचे लोकार्पण,  सांस्कृतिक सभागृहाचे नुतनीकरण,  किल्ला वेस ते जलालशाही चौक रस्ता-कामाचे उद्घाटन अशा विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यातून औसा शहराच्या विकासाला एक चांगली दिशागती मिळाली आहे. यातून जिल्हावासियांनाराज्यातल्या जनतेला एका चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. औसा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. इथे अनेक ऐतिहासिक इमारतीभूईकोट किल्लाऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांचे जतन झाले पाहिजे. पर्यटनवाढीला चालना दिली पाहिजे. यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईलअसे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            औसा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी औसा-माकणी पाणीपुरवठा पाईप लाईन योजना मार्गी लावली. माकणी-निम्न तेरणा प्रकल्प मार्गी लागला आहे. तब्बल ३७ किलोमीटर अंतरावरुन औसा फिल्टरस्थळापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली आहे. औसा नगरपरिषदेने स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनावर येणाऱ्या काळात अधिक काम करावेसांडपाण्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुनर्वापराचे नियोजन करावेपाण्याचा काळजीपूर्वक वापरपुनर्वापर याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावेघनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावाअशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी-अधिकारी यांना यावेळी केल्या.

            शहराच्या विकासासाठी नागरीकांनी नियमित कर भरला पाहिजे. औसा नगरपरिषदेने औसा शहर स्वच्छसुंदर बनविण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे. गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. यापुढेही अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी औसा नगरपरिषदेने संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन सर्व उपाययोजना राबवाव्यातयासाठी नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले. यावेळी विविध विकासकामांचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले.          

 Jai bharat,jai maharashtra✌️ *Relations Do Not Shine By Just Shaking Hands In The Best Time.*

*But*

*Relations Shine By Holding Hands, In Critical Times!!*

*Good morning 😊*

: "*NO & YES are two shortest answers which need a long thought.*

*Most of the things we miss in life is only because of saying,*

*NO too early & YES too late."*

*Good Morning *🚴‍♀️🚴‍♂️

 *माणूस*

आयुष्यात आपल्याला काय कमवायचंय हे कळलं पाहिजे! एकाच घरातील सहा-सहा लोक कोरोनाने गेले... माणसाची किंमत कळायला एवढे लोक जाणं गरजेचं होतं का?

       एकेकाळी चक्रवर्ती समजल्या जाणाऱ्या राजांची आज समाधी कुठे सापडत नाही आणि सापडलीच तर त्यावर फुल व्हायला माणूस सापडत नाही! कालचक्र खूप मोठं आहे, एक जिवंत व्यक्ती म्हणून आपली किंमत त्यापुढे एखाद्या धुलीकणापेक्षाही खूप छोटी आहे. कोरोनाने दाखवून दिलं की, कोणीही सहज मरू शकतो! श्रीमंत, गरीब, वृद्ध, तरुण, पुरूष, स्त्री, वयस्क, मूल, आई, वडील, भाऊ बहीण... जिवंत असलेला प्रत्येकजण अवेळी मरू शकतो हा संदेश या आजाराने दिला!

      या आजाराची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे, या लाटेची दाहकता आपण पाहिली आहे.‌ प्रत्येकाच्या जवळची किमान एक व्यक्ती या लाटेत गेली. पुढील तिसरी, चौथी आणि अशा अनेक लाटा याबद्दल अजूनही अनभिज्ञता आणि भीती आहेच, तरीही आपण 'मीच मोठा' या तोऱ्यात असू तर कुठेतरी चुकतोय. शंभर एकर जमीनीचा मालक दहा वीस मढ्यांसोबत एकाच सरणावर जळून गेला, शेकडोंच्या गोतावळ्यात जिचं तोंड दिसत नव्हतं ती माऊली वारस नसल्यासारखी गेली एकाकी गेली. ज्याच्या हाकेवर गाव‌ गोळा व्हायचा तो अॅम्ब्युलन्समध्ये एका कोपऱ्यात फक्त श्र्वास मिळावा म्हणून तडफडून मेला. असं बोललं जायचं की, याच्या सात पिढ्या बसून खातील तो मात्र पुर्वज आणि वंशज नसल्यासारखा एकटाच गेला!

     जर हे लोक एखाद्या दुर्धर आजाराने किंवा अपघाताने गेले असते तर विषय वेगळा असता, मनाने स्वीकार केला असता पण आठ दिवसांपूर्वी काहीही त्रास नसलेला, चालता-बोलता माणूस गेला ही भावनाच मनाला सहन होत नाही. बरं जी व्यक्ती गेली ती सहजासहजी नाही तर, ज्या गोष्टीची चहूबाजूला मुबलकता आहे अगदी आपल्या शरीराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आहे पण घेऊ शकत नाही त्या अॉक्सिजन अभावी गेली हे किती दु:खद आहे!

     मी बघितलंय या सर्वांना शेवटचा श्वास घेताना, शेवटचा आचका घेताना या सर्व लोकांच्या मनात काय विचार आला असेल? आपली संपत्ती? नातेसंबंध? घर? जमीन? शरीर, कमाई, भविष्य, स्वप्नं... नाव, जात, धर्म? काय आठवलं असेल सर्वात शेवटी? 'फक्त एक... एकच संधी मिळावी, मी माणूस म्हणून जगेल!' असंच वाटलं असेल ना शेवटचा दीर्घ श्वास घेताना? 

     हे सर्व लिहीताना *मी आणि हे वाचताना तुम्ही जिवंत* आहात, आपल्याला अजून एक संधी मिळाली आहे मग आपण *माणूस म्हणून जगत आहोत का?* निसर्ग अधूनमधून माणसाला माणूसपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या महाप्रलयातून आपण वाचलो आहोत आतातरी *माणुसपण शिकायला* काय हरकत आहे की अजून एखाद्या संकटाची वाट बघायचीय?

 अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी

                                      - अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

·       गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई

·       तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश

            मुंबई दि.18: अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले.

            जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. कदम यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

            जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांनी गोदामांमध्ये पोहोच मालाच्या ई-1 रजिस्टरमधील अभिलेख, या अभिलेखाच्या विविध टोल नाक्यावरील असलेल्या नोंदी, जि पि एस यंत्रणे वापर वाहतूकदार नियमाप्रमाणे करत आहेत का? ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पूर्तता करत आहेत का याबाबत संबंधित परिवहन अधिकारी यांचा अहवाल, अन्नधान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग, PDS चे फलक लावण्यात आले आहेत काजळगाव जिल्ह्यातील धान्यांचे पूर्ण वाटप इ पॉस मशिनद्वारे झाले आहे का आदी बाबींचा डॉ कदम यांनी आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यातील या बाबतीत अहवाल शासनाला तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ कदम यांनी दिले.

            राज्यमंत्री डॉ. कदम यांनी जिल्ह्यामधील अन्नधान्य वाहतुकीच्या वाहनांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे जी.पी.एस. यंत्रणा बसविलेली नसल्यास तसेच माल व्यपगत होण्याची प्रकरणे यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले.

            पुढील 3 महिन्यांत सर्व संबंधित वाहतुक व्यवस्थेवर जी.पी.एस. यंत्रणा क्षेत्राची नावे तसेच गैरप्रकाराबाबत तपासणी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

            बैठकीला जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊतसह सचिवसुधीर तुंगारसुनील सुर्यवंशीजिल्हा पुरवठा अधिकारीश्री,प्रशांत कुलकर्णी,सहायक पुरवठा अधिकारी,आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या

उपायांबाबत प्राधान्याने विचार करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       भारतीय वनसेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद

 

          मुंबईदि. 18 : - मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईलअशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. भारतीय वनसेवेत काम करण्याची वेगळी वाट तुम्ही निवडली आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळे करायचे ध्येय्य ठेवाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रात नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला. या संवादादरम्यान मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.  

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजंगलात राहणाऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कसे कमी करता येईलयाचे प्रयत्न व्हायला हवे. त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. मानव व वन्यजीव हा संघर्ष कसा कमी होईल यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी महसूलग्रामविकास आणि वनविभाग अशा विविध विभागांनी समन्वय राखावा लागेल. एकीकडे जंगल वाचविणे आणि दुसरीकडे त्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील विकासकामांच्या बाबतीत रस्तेरेल्वे मार्ग करताना वन्यजीवांचाही प्राधान्याने विचार करायला हवा. त्यांचे मार्ग सुरक्षित राहतीलअसे पूलउन्नत मार्ग असे पर्याय उभे करावे लागतील. भारतीय वनसेवेत दाखल होण्याचा तुमचा निर्णय वेगळी वाट चोखळणारा आहे. आयुष्यात नवे काही तरी करायचेअसे ठरवा आणि ते निश्चयपूर्वक करा, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वृक्षारोपणजंगल क्षेत्र वाढविण्याचे उपाय तसेच वन्यजीवांचे रक्षण याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारीराज्याचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटेतसेच सहा परिविक्षाधीन अधिकारी आदी उपस्थित होते.


Wednesday, 18 August 2021

 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 ची परतफेड

 

            मुंबईदि. 18 : महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसुचना क्र.एलएनएफ-10,11/प्र.क्र.2/अर्थोपाय दि. 16 सप्टेंबर 2011 अनुसार 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 अदत्त शिल्लक रकमेची दि. 20 सप्टेंबर,2021 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 21 सप्टेंबर,2021 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल.परक्राम्य संलेख अधिनियम1881’ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 21 सप्टेंबर2021 पासुन व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकड़े किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी 8.66% महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 च्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करून ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

         रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील ठिकाणा खेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमा डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील. असे प्रसिद्ध पत्रक वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव यांच्याकडून  21 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

0000


Featured post

Lakshvedhi