Thursday, 19 August 2021

 मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या

उपायांबाबत प्राधान्याने विचार करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       भारतीय वनसेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद

 

          मुंबईदि. 18 : - मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईलअशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. भारतीय वनसेवेत काम करण्याची वेगळी वाट तुम्ही निवडली आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळे करायचे ध्येय्य ठेवाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रात नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला. या संवादादरम्यान मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.  

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजंगलात राहणाऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कसे कमी करता येईलयाचे प्रयत्न व्हायला हवे. त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. मानव व वन्यजीव हा संघर्ष कसा कमी होईल यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी महसूलग्रामविकास आणि वनविभाग अशा विविध विभागांनी समन्वय राखावा लागेल. एकीकडे जंगल वाचविणे आणि दुसरीकडे त्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील विकासकामांच्या बाबतीत रस्तेरेल्वे मार्ग करताना वन्यजीवांचाही प्राधान्याने विचार करायला हवा. त्यांचे मार्ग सुरक्षित राहतीलअसे पूलउन्नत मार्ग असे पर्याय उभे करावे लागतील. भारतीय वनसेवेत दाखल होण्याचा तुमचा निर्णय वेगळी वाट चोखळणारा आहे. आयुष्यात नवे काही तरी करायचेअसे ठरवा आणि ते निश्चयपूर्वक करा, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वृक्षारोपणजंगल क्षेत्र वाढविण्याचे उपाय तसेच वन्यजीवांचे रक्षण याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारीराज्याचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटेतसेच सहा परिविक्षाधीन अधिकारी आदी उपस्थित होते.


Wednesday, 18 August 2021

 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 ची परतफेड

 

            मुंबईदि. 18 : महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसुचना क्र.एलएनएफ-10,11/प्र.क्र.2/अर्थोपाय दि. 16 सप्टेंबर 2011 अनुसार 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 अदत्त शिल्लक रकमेची दि. 20 सप्टेंबर,2021 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 21 सप्टेंबर,2021 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल.परक्राम्य संलेख अधिनियम1881’ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 21 सप्टेंबर2021 पासुन व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकड़े किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी 8.66% महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 च्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करून ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

         रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील ठिकाणा खेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमा डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील. असे प्रसिद्ध पत्रक वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव यांच्याकडून  21 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

0000


 समान काम समान वेतन देण्याबाबत

वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक

 वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

         

          मुंबईदि. 18 : कोविड काळात राज्यातील सर्वच पॅथी डॉक्टरांनी काम केले आहे. त्यामुळे या सर्वांना समान काम समान वेतन मिळावे याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असेासिएशन (निमा) च्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक सौरभ विजयआयुषचे संचालक डॉ. के.कोहलीडॉ. संजय लोंढेडॅा. शैलेश निकमडॉ. आशुतोष कुलकर्णीडॉ. राजेश उतानेडॉ. विनायक टेंभुर्णीकरडॉ.श्रीराम रागडसुहास जाधवमनोज देशमुखअनिल बाजरे आदी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणालेसर्वच पॅथी डॉक्टरांना समान काम आणि समान वेतन मिळावे यासाठी विभाग आग्रही आहे. याशिवाय शासन अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबरच खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थ्यांनाही समान विद्यावेतन मिळावे यासाठी आग्रह आहे. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असेासिएशन (निमा)वर प्रशासकही लवकरच नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

0000


 लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक;

पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

 

            मुंबईदि. 18 : औरंगाबादला सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दिपक जाधव या मुलीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिला डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची 2000 रुपयांची पारितोषिकांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली असून या संकटकाळात आपणही काही तरी मदत करावी या भावनेने ‘खारीचा वाटा’ उचलत असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात तिने म्हटले आहे.

            आदितीने आपल्या मदतीचा धनादेश पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नुकताच दिला होता. मुख्यमंत्र्यांना तिने लिहिलेले पत्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचून दाखवण्यात आले. यावेळी सर्व मंत्र्यांनी तिचे कौतुक केले.

            पत्रात आदितीने म्हटले आहे कीनुकताच राज्यात महापूर येऊन गेला. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपली धडपड पाहिली. यातून आपले नेतृत्व आणखी उठून दिसले.  जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं वाटलं. खरच अवघड आहे हे सगळंआपले काम पाहून वाटायचंआपण यात खारीचा वाटा उचलला पाहिजेपूरग्रस्तांना मदत केली पाहिजे. मला माहित आहे मी लहान आहेपण मला डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत मिळालेली बक्षीसाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी वाटली आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहे.

            आदितीने दिलेली मदत अनमोल असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिला खुप सारे आशीर्वाद दिले आहेत तसेच  तुम्ही बालमंडळीच या देशाचा भक्कम आधारस्तंभ असल्याचेही म्हटले आहे.

-----०-----



 सार्वजनिक आरोग्य विभाग

 

कोविड सद्यस्थिती

•  कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे.

•   शुन्य रुग्ण - आज रोजी नंदूरबार जिल्हयात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.

•  दहापेक्षा कमी रुग्ण - राज्यातील धुळेवाशिमयवतमाळभंडारावर्धागोंदिया या सहा जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.

•  शंभरपेक्षा कमी रुग्ण -  राज्यातील परभणीहिंगोलीनांदेडअमरावतीअकोलाबुलढाणाचंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.

•  सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारासांगलीअहमदनगरपुणेउस्मानाबादसोलापूरसिंधुदुर्ग.

•  राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.

• राज्यात गत काही दिवसात कोल्हापूररत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापिआजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

 दिनांक १७ ऑगस्ट २०२१ अखेरची सक्रिय रुग्णसंख्या

·       आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण -  ६४ लाख १ हजार २१३.

·       बरे झालेले रुग्ण -  ६२ लाख १ हजार १६८.

·       एकूण मृत्यू - १ लाख ३५ हजार २५५

·       सक्रीय रुग्ण संख्या - ६१ हजार ३०६.

·       रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के.

 

लसीकरण सद्यस्थिती :

•  राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत.

•  राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे.

• तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.

•  राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.

•   नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापरहाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

oooo

 शासन शब्दकोश भाग-1’ हे भ्रमणध्वनी उपयोजक

गुगल प्लेवर उपलब्ध

 

            मुंबईदि. 18 : शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त  शब्द असलेले  ‘शासन शब्दकोश भाग-1’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपयोजकाची लिंक पुढीलप्रमाणे आहे.  http://play.google.com/store/apos/details?id=gov.mahatarshtra.shabdkoshapp  हे उपयोजक भ्रमणध्वनी स्थापित (Download) करता येणार आहे. भाषा संचालनालयाने   शासन शब्दकोश भाग-1’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

          शासन शब्दकोश भाग-1 या भ्रमणध्वनी उपयोजकामध्ये कार्यदर्शिकाशासन वाक्ययोगशासन व्यवहार कोश आणि न्याय व्यवहार कोश असे एकूण चार कोश डिजीटल स्वरुपात उपलब्ध आहेत.या चारही कोशांना इंग्रजी मराठी तसेच मराठी इंग्रजी या पद्धतीने पाहता येऊ शकते. हे भ्रमणध्वनी उपयोजक आंतरजालासह (With Internet) किंवा आंतरजालाशिवाय (Without Internet) वापरता येऊ शकते. या अनुषंगाने सविस्तर माहितीसाठी किंवा येणाऱ्या अन्य तांत्रिक अडचणींबाबत भाषा संचालकभाषा संचालनालयप्रशासकीय इमारत5 वा मजलाडॉ.आंबेडकर उद्यानाजवळशासकीय वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई-400051. दूरध्वनी क्र.022-26417265 येथे संपर्क साधावा.

           याविषयीचे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

0000


 पदूम विभाग

 

लॉकडाऊनच्या काळातील उर्वरित दूध भूकटी आणि बटर

महानंदला वर्कींग स्टॉक म्हणून देणार

 

            लॉकडाऊनच्या काळातील उत्पादित दूध भूकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांना वर्कींग स्टॉक म्हणून देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            लॉकडाऊनमध्ये प्रतिदिन 10 लाख लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेऊन त्याचे रुपांतरण दूध भूकटीमध्ये करण्याची योजना राबविण्यात आली होती.  या योजनेत 7 हजार 764 मे.टन दूध भूकटीचे उत्पादन झाले.  यापैकी 1500 मे.टन दूध भूकटी डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजनेत देण्यात आली असून उर्वरित 6 हजार 264 मे.टन भूकटीपैकी 3017 मे.टन भूकटी एनसीडीएफआय पोर्टलवर विक्री करण्यात आली आहे.  महानंदकडे आता या योजनेंतर्गत 3247 मे.टन इतकी भूकटी शिल्लक आहे.  याशिवाय 4044 मे.टन देशी कुकींग बटर पैकी 3585 मे.टन बटर विकण्यात आले असून 459 मे.टन बटर शिल्लक आहे.  शिल्लक राहिलेली भूकटी व बटर हे महानंदास वर्कींग स्टॉक म्हणून व्यवसायासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi