Monday, 16 August 2021

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम* 


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.


♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦


✅ 1. *वजन वाढते* 

वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.


✅ *2. चक्कर येणे* 

भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.


✅ *3.तणाव* 

भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.


✅ *4. अन्य आजार* 

वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात.


✅ *5.लठ्ठपणावर नियंत्रण* 

योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा.


✅ *6.मेंदूचे कार्य* 

ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.


✅ *7.चिडचिड* 

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या

 मूडवर याचा परिणाम होतो.

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

Sara speech

 https://photos.app.goo.gl/5FQTjXSJfHpqayZT8

Sunday, 15 August 2021

जय हो ०१: Sara speech

जय हो ०१: Sara speech:   

Sara speech

  

 उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार राष्ट्रपती पोलीस पदक

राज्याला एकूण 74 पोलीस पदक

 

        नवी दिल्लीदि. 14 : पोलीस पदकांची आज घोषणा झालीमहाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील   पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, २५ पोलीस शौर्य पदक  तसेच  प्रशंसनीय सेवेकरिता ४५ पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करतेयावर्षी  शौर्य पदक श्रेणीमध्ये  ६३०  व  सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८०  पोलीस पदक जाहीर झाली  आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी),  तर ६२८ पोलिसांना पोलीस शौर्य पदक<span lang="EN-US" style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-Surekh; mso-fareast-font-family: 'Times New Roman'; color: #222222; mso-ansi-lang


 पुणे जिल्ह्यातील वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या कोटी 76 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने कारवाई

--

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणारमंत्री नवाब मलिक

 

            मुंबईदि. 14 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा  परस्पर अपहार केल्याप्रकरणी तसेच यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ मंडळाचे पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            याप्रकरणी इम्तियाज महम्मद हुसेन शेख (रा. रामनगरयेरवडापुणे) आणि चांद रमजान मुलाणी (राहणार सदर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून स्वतःला ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टचे (मौजे माणता. मुळशीजि. पुणे)अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून या रकमेचा अपहार केला आहे.

            ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत आहे. या मंडळाकडील हेक्टर 51 आर क्षेत्राची जमीन एमआयडीसी अधिनियमान्वये राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक चारसाठी शासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली होती. यासाठी कोटी 64 लाख रुपये इतकी निवाडा रक्कम मंजूर झाली होती. परंतु बरेच दिवस ही रक्कम न मिळाल्याने ट्रस्टने वक्फ मंडळाला तसे कळविले. पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून याची दखल घेऊन भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांचेकडे चौकशी करण्यात आलीत्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. 

            इम्तियाज महम्मद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी या दोघांनी स्वतःला संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून तसेच वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बनावट नाहरकत पत्र पुणे  भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यानंतर या दोघांनी जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळालेल्या कोटी 76 लाख 98 हजार रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा न करता तो वैयक्तिक बँक खात्यावर जमा केला आणि त्या माध्यमातून रकमेचा अपहार केला. तथापिपुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून उपजिल्हाधिकारीभूसंपादन क्र. 13, पुणे  यांच्याकडे याबाबत  करण्यात आलेल्या तक्रारीची दखल न घेता उपजिल्हाधिकाऱ्यांकडून वक्फ कार्यालयाचा अर्ज फेटाळण्यात आल्याचेही पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

            ही बाब लक्षात आल्यानंतर पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत रकमेचा अपहार करणाऱ्या शेख आणि मुलाणी या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलणार

मंत्री नवाब मलिक

            यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक म्हणाले कीवक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

 संयम आणि शिस्तीचे पालन करीत देशराज्याला

कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया

-        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुख्यमंत्र्याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

·       कोरोनायोद्ध्यांची भेट घेत केली आस्थेवाईकपणे चौकशी

·       अनेकांचे बलीदान आणि समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करुयास्वातंत्र्याचे मूल्य जपुया

मुंबईदि. 15 : कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुयाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री श्रीठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेकोरोनाविषयक नियमांचे पालन करुन मर्यादीत उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आलामुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ताराज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटीलमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरमुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेराज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटेराजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकरराज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेमुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोरोना योद्ध्यांची भेट घेतलीत्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून ते करत असलेल्या कामकाजाची माहिती घेतलीयानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजडॉबाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

राज्यातील  राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचा नामोल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचे अभिनंदन व कार्याचा गौरव केला.

मुख्यमंत्री श्रीठाकरे म्हणाले कीछत्रपती ‍शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवलीपरकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतोआक्रमण परतवून लावू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दाखवूनच नाही दिले तर तसा विश्वास आणि प्रेरणाही आपल्याला दिलीराजर्षी शाहू महाराजमहात्मा जोतिबा फुलेडॉबाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील कुप्रथाविषमता यांच्या बेड्या तोडल्याविषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्यसमता म्हणजे काय हे सांगितलेत्यांनी स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला पटवून दिले.

Featured post

Lakshvedhi