Sunday, 15 August 2021

 संयम आणि शिस्तीचे पालन करीत देशराज्याला

कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया

-        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुख्यमंत्र्याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

·       कोरोनायोद्ध्यांची भेट घेत केली आस्थेवाईकपणे चौकशी

·       अनेकांचे बलीदान आणि समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करुयास्वातंत्र्याचे मूल्य जपुया

मुंबईदि. 15 : कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुयाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री श्रीठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेकोरोनाविषयक नियमांचे पालन करुन मर्यादीत उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आलामुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ताराज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटीलमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरमुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेराज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटेराजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकरराज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेमुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोरोना योद्ध्यांची भेट घेतलीत्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून ते करत असलेल्या कामकाजाची माहिती घेतलीयानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजडॉबाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

राज्यातील  राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचा नामोल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचे अभिनंदन व कार्याचा गौरव केला.

मुख्यमंत्री श्रीठाकरे म्हणाले कीछत्रपती ‍शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवलीपरकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतोआक्रमण परतवून लावू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दाखवूनच नाही दिले तर तसा विश्वास आणि प्रेरणाही आपल्याला दिलीराजर्षी शाहू महाराजमहात्मा जोतिबा फुलेडॉबाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील कुप्रथाविषमता यांच्या बेड्या तोडल्याविषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्यसमता म्हणजे काय हे सांगितलेत्यांनी स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला पटवून दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi