Tuesday, 10 August 2021

 विविध मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद

मासेविक्रेत्यांसाठी राज्यात शीतगृहे उभारण्याचा आराखडा सादर करा

मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख

            मुंबईदि. 10 : मच्छिमार संस्थांना डिझेल परताव्याची थकित रक्कम देण्यात येत आहे. मच्छिमारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक काम करत आहे. मासे विक्री वाढविण्यासाठी राज्यात शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यासंदर्भात आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            सह्याद्री अतिथीगृहात मच्छिमार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मंत्री श्री. शेख यांनी लागोपाठ बैठक घेतल्या. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवारआमदार भाई जगतापविभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्तामत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणेमच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी विजय वैतीदेवेंद्र तांडेलरामदास संघेधनाजी कोळीसंतोष कोळीजोसेफ कोलासोअमोल रोगेदिलीप कोळीलिओ कोलासो आदी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी कोवीड प्रादुर्भावामुळे व वादळांमुळे उद्भवलेल्या समस्यातौक्ते व निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना मदत देणेवादळग्रस्तांच्या मदतीसंदर्भातील निकषात सुधारणा करणेकर्ज व व्याजामध्ये सवलत देणेगोराई कोळीवाड्यातील समस्याजमशेटजी बंदराचे बंद पडलेले काममासळी विक्रेत्यांना अनुदान देणेमुंबईतील विविध मच्छिमार्केटला पर्यायी जागा देणेट्रॉम्बे येथील जेट्टीतील सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

            मंत्री श्री. शेख म्हणाले कीचक्रीवादळातील नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. अवैध मासेमारीविरुद्ध लवकरच कडक कायदा येत आहे. तसेच राज्याबाहेरील बोटींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध डिझेल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

 कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी

प्रस्तावित नवीन योजनेसंदर्भात आढावा बैठक

 

            मुंबई, दि. 10 : कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित योजनेसंदर्भात  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमारउपसचिव का.गो.वळवी, पणन संचालक सतीश सोनी, व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवारसहसंचालक विनायक कोकरेसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

             बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकासशेतमालाची साफसफाईप्रतवारी करुन तात्पुरती साठवणूकफळेभाजीपाला व फुले यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जावाढ, काढणी-पश्चात आणि आणि हाताळणी दरम्यान होणारे नुकसान कमी करुन अंतिमत: शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणेबाजार समितीसाठी नविन उत्पन्नाचे स्त्रोत निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

 भायखळा आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

29 ट्रेडसाठी 1500 जागा उपलब्ध

    मुंबईदि. 10 : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29 ट्रेडसाठी 1 हजार 500 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहेदहावी उत्तीर्ण इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेअसे आवाहन प्राचार्य आरबीभावसार यांनी केले आहेमुंबई शहर जिल्ह्यामध्ये भायखळा आयटीआयसह दादर येथे मुलींचे तसेच जनरल आयटीआयमांडवीधारावीलोअर परेलमुंबई-01 या शासकीय आयटीआयसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

भायखळा आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा संस्थेतच उपलब्ध करुन देण्यात आली आहेज्या उमेदवारांना संस्थेत येणे शक्य नसेल त्यांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावीआयटीआयच्या ट्रेड (कोर्सबद्दलची माहिती https://mumbai.dvet.gov.in/mumbai-city-institutes/iti-mumbai-11/ या लिंकवर उपलब्ध आहेप्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी https://meet.google.com/nqp-chnm-esi या गुगल लिंकवर दररोज वेळ दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन करण्यात येते.

      374, साने गुरुजी मार्गआग्रीपाडा पोलिस स्टेशनसमोरघास गलीभायखळामुंबई - 11 येथे हे आयटीआय कार्यरत आहेभायखळा रेल्वे स्टेशनमहालक्ष्मी रेल्वे स्टेशन  मुंबई सेंट्रलपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आयटीआय आहेअधिक माहितीसाठी विजया शिंदे (मोबाईल क्रमांक 8689986244 आणि डी.जेगावकर  (मोबाईल क्रमांक 8689971216) यांच्याशी संपर्क साधावा.

      प्रत्येक व्यवसायाच्या तुकडीमध्ये 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेतकॉम्पुटर ऑपरेटर अँ प्रोग्रामींग सिस्टंटसर्व्हेअरड्रॉप्टमन सिव्हीलड्रॉप्टसमन मेकॅनिकलइलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिइन्फरमेशन कमुनिकेशन टेक्नॉलाजी आर्कीटेक्चरलड्रॉप्टसमनडेक्स टॉप ब्लिशिंग (डी टी पीइंटेरीअर डेकोरेटरइलेक्ट्रीशियनवायरमन या ट्रेडची महिलांमध्ये मागणी असतेमहिलासांठी रेल्वेमध्ये प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.

      भायखळा आयटीआमध्ये टेक्नीशियन मेडीकल इलेक्ट्रॉनिक्सटेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविले जातातमुंबई हे मेडीकल  मेडीकल क्विपमेंट मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचे हब असून येथील हॉस्पीटलमध्ये मशिन दुरुस्तीचे काम या व्यवसायात शिकविले जातेमुंबई येथील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पुष्कळ रोजगार उपलब्ध असून त्याकरिता ड्रॉफटसमन सिव्हीलर्व्हेअरकारपेंटरइंटेरीअर डेकोरेटर आणि डिजाईनप्लंबरमेसन या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जातेमुंबईमध्ये ऑटोमोबाईल र्व्हि स्टेशन पुष्कळ आहेततसेच महिंद्रा अँड हिंद्राआयशर सारख्या इंडस्ट्री आहेतया इंडस्ट्रीला तसेच टोमोबाईल र्व्हि स्टेशनला लागणारी मेकॅनि मोटार व्हेईकलडिझेल मेकॅनिवेल्डर हे ट्रेड या आयटीआयमध्ये शिकविले जातात.

      मुंबई येथे सर्विस इंडस्ट्रीमध्ये सुध्दा पुष्कळ रोजगार उपलब्ध आहेतमुंबई येथे आयटी इंडस्ट्री आहेत्याकरीता लागणारे कॉम्पुटर ऑपरेटर ॲड प्रोग्रामींग सिस्टंटकॉम्पटर हार्डवेअर ॲन्ड नेटवर्की मेकॅनि तसेच र्व्हि इंडस्ट्रीला लागणारी वायरमनइलेक्ट्रीशियनमेकॅनिक रेफ्रीजिरेशन ॲड एअर कंडीशनींगडेस्कटॉप ब्लिशींग ऑपरेटर हे अभ्यासक्रम शिकविले जातातमुंबईत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी इंडस्ट्रीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेतत्याकरीता लागणारे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिइन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेश टेक्नॉलॉजीटेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनीक्स ॲड सिस्टीमचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गरज असतेहे ट्रेड देखील या संस्थेमध्ये शिकविले जातातमॅनुफॅक्चरींग इंडस्ट्री उदागोदरेजमहिंद्रा ॲड महिंद्राभारत गिअर्सआयशरतळोजा एमआयडीसी तसेच ठाणे-बेलापूर रोडवरतारापूर एमआयडीसीमध्ये पुष्कळ मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीज आहेतत्याकरीता लागणारे फीटरमशिन टूल मेंटेनन्समशिनिष्टमशिनिष्ट ग्राईंडरवेल्डरटूल डायमेकरटर्नर या व्यवसाय ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या <span lang="HI" style="font-size: 12.0


 ऑक्सिजन बाबतीत महाराष्ट्र देशातील

पहिले स्वयंपूर्ण राज्य ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मीरा-भाईंदर ऑक्स‍िजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण

 

             ठाणे, दि. 10 : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला. आता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्स‍िजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे महाराष्ट्र हे देशातील ऑक्स‍िजन बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            मीरा-भाईंदर येथील ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

            मीरा-भाईंदर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी विकासकामे केलेली आहेत, यामध्ये जलतरण तलाव तसेच नाट्यगृह यांचे काम प्रगतिपथावर आहे. मीरा-भाईंदर भागांमध्ये कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत आणि भविष्यामध्ये केली जाणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याने ऑक्स‍िजन प्रकल्प उभारला होता यामुळे ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा होण्याचा मान मिळविला आहे.

            मागील लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्स‍िजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

            कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

००००

Featured post

Lakshvedhi