Monday, 26 July 2021

 *🕰️   वेळ कशी बदलते*  🕰️


  *जगप्रसिद्ध बाॅडीबिल्डर, माजी गव्हर्नर, हाॅलीवूड स्टार अभिनेता  ""अरनॉल्ड श्वार्झनेगर""  यांनी त्यांच्या स्वतःच्या पुतळ्याखाली रस्त्यावर झोपलेल्या स्थितीत एक छायाचित्र पोस्ट केलं आणि खिन्नपणे लिहिलं...

*👉🏼" वेळ कशी बदलते.."👈🏻*

•••••••

त्याने हे वाक्य लिहिले, कारण तो फक्त वृद्ध झालाय म्हणून नव्हे, तर तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असताना त्याने एका प्रशस्त हॉटेलसमोर हॉटेल मालकाच्या विनंतीवरून या स्वतःच्या शिल्पाचे अनावरण केले होते... 


एका हॉटेल प्रशासनाला स्वतःचे शिल्प ठेवण्याची परवानगी दिली होती, तेव्हा हॉटेल अधिका-यांनी अरनाॅल्डला सांगितले की,  "कोणत्याही वेळी आपण येऊन आपल्या नावावर एक खोली आरक्षित करू शकतात".


पण हल्ली जेव्हा अरनॉल्ड हॉटेल मध्ये रूम बुक करण्यास गेले... तेव्हा हाॅटेल प्रशासनाने त्यांना हॉटेल पूर्णपणे बुक असल्याबद्दल सांगितले, त्यामुळे कोणतीही रूम आपणास मिळू शकणार नाही असे सांगितले...


मग अरनॉल्डनी एक कव्हर आणले आणि स्वतःच्या पुतळ्याशेजारी ते झोपले आणि लोकांना कल्पना करायला सांगितले की, मी असा का माझ्याच पुतळ्याजवळ झोपलो आहे ...?


ते सांगू इच्छित होते की, जेव्हा माझ्याकडे पद होते, तेव्हा लोक माझी स्तुती करत होते आणि जेव्हा मी पद गमविले , तेव्हा हाॅटेल प्रशासन ते वचन विसरले, त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही...


 *होय, वेळ बदलली आहे.*


*आपल्या स्थितीवर किंवा  आपल्या शक्तीवर अतिविश्वास ठेवू नका. हे सर्व टिकणार नाही.*


*आपल्या पदाचा, सत्तेचा, संपत्तीचा कधीही गर्व करू नका कारण हे शाश्वत नाही*.



*╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯*

 🕉 *श्री स्वामी समर्थ* 🕉


*!!आयुर्वेदीक भिमसेनी कापुर*


*भीमसेनी कापूर चे औषधी गुणधर्म*


👉♨ *हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते*


♨👉 *सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत* *नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल*

♨👉  *रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा*


♨👉 *पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापुर हुंगावा*


♨👉 *तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी* .


♨👉  *केसातील कोंड्याकरीता*

*सतत सर्दी होत* *असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे*

*नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे* *शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे*


♨👉 *नेहमीच्या कापरात मेण असते* 

*पण यात मेण नसते*

 *त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा*. *आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात* 

*श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो*


♨👉 *दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व  लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही*.


♨👉 *खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात*

 *शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते*

*संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही,*


*🚩🏵‼कापराचे इतर ही काही उपयोग‼🏵*


♨👉 *१ प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येता एक छान सुगंध येतो*  *कपड्यांना कसर झुरळ लागत नाही*

*पावसाळ्यात विशेषत: कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना कुबट वास येतो तो कापूर ठेवल्या जातो*


♨👉 *२ डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत च शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात*


♨👉 *३ कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात*


♨👉 *४ रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही*


♨👉 *५ गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लीक्वीड ऐवजी त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित*


♨👉 *६ कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल*


*♨कापूर पवित्र का मानला जातो.?♨*

🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼

*🚩🔔जाणुन घ्या धार्मिक कारण*


🚩👉♨ *शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही*

♨ *कापूर लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा पवित्र वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते*


*♨कापराचे वैज्ञानिक महत्त्व♨*

🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼

🚩♨👉 *वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की*

*🌼‼कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होउन वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.‼🌼*


*🚩♨‼🌼कापूराचे अजून काही फायदे🌼‼♨*


🚩♨१) *सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही*

🚩♨२) *कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो*

🚩♨३) *कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो*

🚩♨४) *कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते*

🚩♨५) *घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो*

🚩♨६) *मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते*

🚩♨७) *मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाही.*

🚩♨७) *गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. *(५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी)*

*कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते*


*♨‼आपल्या घरात नियमीतपणे कापुर वापरा व उत्साहित रहा‼


         🕉 *श्री गुरु देव दत्त*🕉

       

         🕉 *श्री स्वामी समर्थ*🕉

 -

*समाजाच्या काय तू कामी पडला..?* 


'मान्य आहे शून्यातूनी , 

 तू  लयी वरती चढला..

'पण सांग तू गड्या 

समाजाच्या काय कामी पडला...?


'धनामधली कोणासाठी 

मोडली नाही काडी...

दरवर्षाला स्वतःसाठी , 

घेत गेला 'गाडी...

दिला नाही ' कांदा जरी 

घरी तुझ्या सडला......

'सांग तू जरा   समाजाच्या काय तू कामी पडला....?


तुझा नित्त्य चढत आहे 

मजल्यावरती 'मजला....

लहानपणीचा तुझाच 'यार '

ऊघड्यावरती निजला...!

तुझ्यामधला मित्र गड्या 

सांग कुठे दडला...?

'सांग  तू जरा  समाजाच्या काय  कामी पडला...?


'गरिबीनं गांजलेली

 माणसं आला बघत...

तरीही तू आपल्याच आहे ,

 मस्तीमध्ये 'जगत....

तुझ्यावाचून नाही जरी 

संसार त्यांचा 'अडला...

पण सांग तू जरा  समाजाच्या काय 

कामी पडला...?"


'जन्मल्या त्या समाजाचा

 जरा ऋणी राह्य तू....

'मागे राह्यल्या समाजाला ,

मागे वळून पाह्य तू...

कोणी नाही पुसत ऊद्या ,

तू  कितीही 'मोठा घडला...

सांग तू  जरा  समाजाच्या काय कामी पडला..?


     *सुंदर कविता*


🌹🌹🌹🌷🌷🌷🌹🌹

 *जय  भारत, जय  महाराष्ट्र 🚩     All Fingers are not in the same Length. But when they Bend, all stands Equal. Life become easy when we Bend and Adjust all Situational. 


Have A Blessed Day. Wishing You A Very Happy, Healthy And Energetic Morning.


*मुस्कुरा कर देखने, और देख कर मुस्कुराने मे बड़ा फर्क है। नतीजे बदल जाते हैं, और कभी कभी तो रिश्ते भी।*😁😗

By the time a man realizes that may be his father was right, he usually has a son who thinks he is wrong.

- Charles Wadsworth -

🧿 *Good Morning*            lakshvedhimm.blogspot. com,                                           📞*9876824365                           lakshvedimm@gmail.com

*Stay Home Stay Safe*

  🏃‍♀️🏃🏻‍♂️🧎🧎‍♀️👨🏻‍🦯👩‍🦽

 *हात तिचाच पकडा जी तुमचा हात मरेपर्यंत सोडणार नाही.*


*उदा : वीज तार 

Sunday, 25 July 2021

Devendra फडणवीस visit

 तळियेचिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर

नारायण राणेप्रवीण दरेकरांसह केला कोकणचा दौरा

 

मुंबई, 25 जुलै                                  

कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणेविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत त्यांनी आज कोकणचा दौरा केला.

या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये या गावांतून झाला. येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. याठिकाणी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावांत झालेले नुकसान सुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावेअसा प्रयत्न केला. आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि सोबतच पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावेयासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना तातडीने मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी सुद्धा शक्य ती सर्व तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे.

त्यानंतर चिपळूणमध्ये सुद्धा पुराने झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. येथे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील स्थिती तर भयावह आहे. काहीच शिल्लक राहिलेले नाही. या सर्वांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत द्यायला हवीअशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कीया नागरिकांचे कागदपत्र सुद्धा पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे कागदपत्र नाहीतहे गृहित धरून ही मदत करावी लागेल. कोल्हापूर-सांगलीच्या पुराच्या वेळी आपले सरकार असताना थेट रोखीने मदत देण्यात आली होती. नवीन घरे बांधून होत नाहीततोवर भाडे सुद्धा दिले होते. तशीच मदत आताही देण्यात यावी. तातडीच्या मदतीत निकषांचा विचार करायचा नसतो. निकषांनुसार भरीव मदत पुढच्या काळात होत राहील. अंगावर घालायला कपडे सुद्धा नागरिकांकडे नाहीत. सारेच वाहून गेले आहे. तीन ठिकाणी कम्युनिटी किचन भाजपाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.

 

वर्षभरात कोकणात ज्या घटना घडल्या आहेतत्या पाहता थोडा वेगळा विचार येणार्‍या काळात करावा लागेल. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आणि यादृष्टीने रोडमॅप’ तयार करण्याची नितांत गरज आहे. अलमट्टीचा विसर्ग सुरू होतोतेव्हा कर्नाटकात पूर येतो. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच अतिरिक्त विसर्ग केला तर बरे होईलअशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे. थोडे धाडस करावे लागेलअसेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

C m visit

 आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला नागरिकांशी संवाद

 

-आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय

-तातडीची सर्व मदत पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

            रत्नागिरी दि.  25 :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाहीराज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईलअसे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले. 

            वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.   प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

            यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परबउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतजिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधवखासदार विनायक राऊतआमदार सर्वश्री भास्कर जाधवराजन साळवीशेखर निकममुख्य सचिव सीताराम कुंटेमाजी मंत्री रविंद्र मानेविभागीय आयुक्त विलास पाटीलजिल्हाधिकारी        डॉ. बी.एन. पाटीलजिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्गजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे.   त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल.  दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडे-लत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले.  केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे.  माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणे झाले आहे.  एनडीआरएफलष्कर तसेच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेतअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीकेंद्राकडून आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मागणी केली जाणार आहे.

            बैठकीत आरंभी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी झालेल्या नुकसानीबाबत व बचाव कार्य आणि मदत याबाबतची माहिती बैठकीत सादर केली.पालकमंत्री ॲङ अनिल परबउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतआमदार भास्कर जाधव आदी मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत होते.

 

साहेबहोतं नव्हतं सर्व गेलंआम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका

महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

 

            "तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना ? तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघूते आमच्यावर सोडा"अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. "आम्हाला आश्वासन नकोमदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नकाआम्हाला मदत करा"असा टाहोच  एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर फोडला.

 

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचे आणि स्थानिकांचं सांत्वन केले. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत पालकमंत्री ॲड.अनिल परबउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतखासदार विनायक राऊतआमदार भास्कर जाधवमिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेबतुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका होअसं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.यावेळी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघूअसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

0000

 

 😥😰😓😢😩😭

Featured post

Lakshvedhi