-
*समाजाच्या काय तू कामी पडला..?*
'मान्य आहे शून्यातूनी ,
तू लयी वरती चढला..
'पण सांग तू गड्या
समाजाच्या काय कामी पडला...?
'धनामधली कोणासाठी
मोडली नाही काडी...
दरवर्षाला स्वतःसाठी ,
घेत गेला 'गाडी...
दिला नाही ' कांदा जरी
घरी तुझ्या सडला......
'सांग तू जरा समाजाच्या काय तू कामी पडला....?
तुझा नित्त्य चढत आहे
मजल्यावरती 'मजला....
लहानपणीचा तुझाच 'यार '
ऊघड्यावरती निजला...!
तुझ्यामधला मित्र गड्या
सांग कुठे दडला...?
'सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला...?
'गरिबीनं गांजलेली
माणसं आला बघत...
तरीही तू आपल्याच आहे ,
मस्तीमध्ये 'जगत....
तुझ्यावाचून नाही जरी
संसार त्यांचा 'अडला...
पण सांग तू जरा समाजाच्या काय
कामी पडला...?"
'जन्मल्या त्या समाजाचा
जरा ऋणी राह्य तू....
'मागे राह्यल्या समाजाला ,
मागे वळून पाह्य तू...
कोणी नाही पुसत ऊद्या ,
तू कितीही 'मोठा घडला...
सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला..?
*सुंदर कविता*
🌹🌹🌹🌷🌷🌷🌹🌹
No comments:
Post a Comment