१२ कोटी भाविकांच्या सुरक्षित व सुलभ दर्शनासाठी वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधा याबाबत सविस्तर नियोजन सादर करण्यात आले, त्याबाबत ते म्हणाले, नाशिक रिंग रोड, साधुग्राम उभारणी, रेल्वे स्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेस तसेच विस्तृत पार्किंग व्यवस्थेची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'डिजिटल कुंभ' संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, 'कुंभदूत' एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, तसेच एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले.
No comments:
Post a Comment