विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा द्यावी
कुलगुरूंना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना
- विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडवा
मुंबई, दि. १८ : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आरोग्यसुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि सर्वांगीण विकासाला पूरक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी अतिशय संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या सूचना, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
No comments:
Post a Comment