सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 27 : पंढरपूरच्या विकास आराखड्यात वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मागण्यांचा समावेश करून सर्वांना विश्वासात घेतच आराखडा अंतिम करण्यात येईल. पंढरपूरचा विकास हा पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केला जात आहे, दरवर्षी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराचा एकात्मिक आणि दीर्घकालीन विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment