पेसा’ नोकरभरतीला गती‘
‘पेसा’अंतर्गत नोकरभरतीसंदर्भात सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. छोट्या संवर्गातील अनुसूचित जमातीच्या बिंदूनामावलीतील स्थानाबाबत समिती गठित करण्यात आली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
डीबीटी आणि सेंट्रल किचन हे धोरणात्मक विषय असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यास विद्यार्थ्यांनी संमती दर्शविली आहे. राज्यातील १३ सेंट्रल किचनच्या माध्यमातून सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना भोजन मिळते याबाबतचा निर्णय चर्चा आणि अभ्यासानंतर घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना लेखी स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. शासन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करुन उज्ज्वल भवितव्याची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी केले
No comments:
Post a Comment