Tuesday, 25 August 2026

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा २ लाख ४४ हजार लाभार्थ्यांना लाभ · प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार, दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजारांचा लाभ

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा २ लाख ४४ हजार लाभार्थ्यांना लाभ

·         प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार,

दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजारांचा लाभ

 

            मुंबई, दि. २४ : गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत २०२६-२७ या वर्षात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ३५४ लाभार्थी महिलांना लाभ देण्यात आला असून, सर्व पात्र लाभार्थींना १०० टक्के लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

योजनेनुसार पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. पहिल्या हप्त्यात तीन हजार रुपये, तर बाळाची जन्मनोंदणी आणि आवश्यक प्राथमिक लसीकरणाचे चक्र पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. दुसरे अपत्य मुलगी असल्यास जन्मानंतर एकाच हप्त्यात सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. ही रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा केली जाते.

राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी १ जून २०२६ पासून महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात येत आहे. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही आर्थिक परिस्थितीमुळे मजुरीचे काम करणाऱ्या महिलांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना सकस आहार व आवश्यक आरोग्यसेवा घेता यावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi