पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्राची कामगिरी:
३८ हजार महिलांना आर्थिक आधार: उमेद अभियानाने गेल्या पाच वर्षांत PMFME योजनेच्या अंतर्गत राज्यातील ३८,००० स्वयं सहाय्यता समूहातील सदस्यांना सुमारे १३६ कोटी रुपयांचे बीज भांडवल यशस्वीरीत्या वितरित केले आहे.
ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना: या मिळालेल्या बीज भांडवलाच्या मदतीने ग्रामीण भागातील हजारो महिलांनी स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. यामुळे महिलांना नियमित उत्पन्न, रोजगार आणि स्वावलंबनाची शाश्वत संधी उपलब्ध झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावर दखल: महाराष्ट्रात 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना शाश्वत उपजीविकेकडे नेण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा करण्यात आली.
हा पुरस्कार म्हणजे राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवणाऱ्या स्वयं सहाय्यता समूहातील सर्व कष्टकरी महिलांच्या उल्लेखनीय परिश्रमांची पोचपावती आहे. या पुरस्कारामुळे राज्यभरातील आमच्या भगिनींना अजून जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. उमेद अभियानाच्या महिलांना प्रेरणा मिळून १ कोटी लखपती दीदी बनविण्याच्या संकल्पाला हातभार लागणार आहे. असल्याचे मत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी यावेळी व्यक्त
No comments:
Post a Comment