Monday, 24 August 2026

कुशल मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेला बळ

 कुशल मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेला बळ

गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांसोबत प्रशिक्षित नर्सिंग आणि पॅरामेडिकल मनुष्यबळाचे रुग्णालयनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढीतील मनुष्यबळ, आहारतज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते आदींचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातूनही सार्वजनिक आरोग्य संस्थांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये १११ सुपर स्पेशालिस्ट, ,५१९ स्पेशालिस्ट, ,९१९ वैद्यकीय अधिकारी, ,००५ आयुष वैद्यकीय अधिकारी आणि ११,५७१ स्टाफ नर्स यांचा समावेश आहे.

रुग्णालयाच्या स्तरानुसार अत्यावश्यक औषधांची यादी आणि आवश्यक औषधसाठ्याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराच्या वेळी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi