Sunday, 9 August 2026

नाशिकची ओळख उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्र

 नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून देशभरात वेगळी ओळख आहे. आता या प्रकल्पामुळे नाशिकची ओळख उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्र म्हणूनही निर्माण होईल. राज्य शासन या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सहकार्य देत असून, विद्यापीठाच्या उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन असून, ७/१२ उतारा हस्तांतरित झाल्यामुळे संबंधित जमिनीचे अभिलेख विद्यापीठाच्या नावे वर्ग झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi