Tuesday, 25 August 2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वेळेत पूर्ण करावे

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वेळेत पूर्ण  करावे

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

            मुंबई, दि. २४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल, दादर येथील स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

 

            इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेली कामे, आवश्यक साहित्याची उपलब्धता, वाढीव कामे तसेच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi