राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ४ प्रमुख, १६ उपनगरीय आणि ५ स्पेशालिटी रुग्णालये कार्यरत आहेत. त्यापैकी ४ प्रमुख व ३ उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआरआय, तर ४ प्रमुख व ५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध असून सर्व सीटी स्कॅन यंत्रणा कार्यरत आहेत डॉ. बी. वाय. एल. नायर धर्मादाय रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांना छोटा सायन येथील महानगरपालिका मान्यताप्राप्त सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) एमआरआय केंद्रात महानगरपालिकेच्या निर्धारित दराने सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दररोज सुमारे ६,००० बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात, तर १,९५० आंतररुग्णांसाठी खाटांची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयातील दोन सीटी स्कॅन मशीन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दररोज ११० ते १२० सीटी स्कॅन केले जातात. आपत्कालीन रुग्णांचे सीटी स्कॅन त्याच दिवशी, तर आंतररुग्णांचे १ ते २ दिवसांत केले जातात. बाह्यरुग्णांसाठी सुमारे एक महिन्याची प्रतीक्षा आहे.
No comments:
Post a Comment