केईएममध्ये एक एमआरआय मशीन कार्यरत असून त्याद्वारे दररोज २५ ते ३० एमआरआय केले जातात. गंभीर रुग्णांना तातडीने, तर आंतररुग्णांना १ ते २ दिवसांत एमआरआयची सुविधा दिली जाते. बाह्यरुग्णांना महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये तसेच चार मान्यताप्राप्त केंद्रांवर महानगरपालिकेच्या दराने एमआरआयची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
तसेच, केईएम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात केसपेपर वितरणासाठी एकूण १९ संगणकीकृत (एचएमआयएस) खिडक्या उपलब्ध असून आपत्कालीन रुग्णांसाठी २४ तास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment