Monday, 13 July 2026

मुंबईतील चार प्रमुख महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ऑक्टोबरपर्यंत नवीन एमआरआय मशीन

 मुंबईतील चार प्रमुख महानगरपालिका रुग्णालयांमध्ये

 ऑक्टोबरपर्यंत नवीन एमआरआय मशीन

राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि. १०  : किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालय, डॉ. बी. वाय. एल. नायर धर्मादाय रुग्णालय, डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (सायन) या चारही प्रमुख महानगरपालिका रुग्णालयांमध्ये नवीन एमआरआय मशीन खरेदीची प्रक्रिया तसेच प्राथमिक उभारणी पूर्ण झाली असून ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही एमआरआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणांबाबत सदस्य अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi