Thursday, 16 July 2026

महाराष्ट्र हे देशातील वस्त्रोद्योगाचे एक प्रमुख जागतिक केंद्र आहे. राज्याच्या 'एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण

 वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा यांनी यावेळी महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रगतीची माहिती दिली. महाराष्ट्र  हे देशातील वस्त्रोद्योगाचे एक प्रमुख जागतिक केंद्र आहे. राज्याच्या 'एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८' अंतर्गत तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला आपण अग्रक्रम दिला आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येक महसूल विभागात एक याप्रमाणे राज्यात एकूण सहा तांत्रिक वस्त्रोद्योग उद्याने स्थापन केली जात आहेत. याशिवाय, तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन, नवकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र 'महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान' जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना ५५ टक्के किंवा २५० कोटी रुपयांपर्यंतचे भरीव भांडवली अनुदान देण्यासोबतच, गुणवत्ता आणि शाश्वततेसाठी सौर ऊर्जा अनुदान व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीलाही आपण विशेष प्रोत्साहन देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi