Thursday, 16 July 2026

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना

 महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक  स्तरावर चालना

- निवासी आयुक्त श्वेता सिंघल

 

नवी दिल्ली, १५ : येथील भारत मंडपम येथे भरवण्यात आलेल्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योग निर्यातीला देशपातळीवर आणि जागतिक स्तरावर निश्चितच मोठी चालना मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या येथील निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनातील महाराष्ट्राच्या दालनाला खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनाची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल म्हणाल्या  महाराष्ट्राचे दालन अत्यंत आकर्षक पद्धतीने उभारण्यात आले असून राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योगाची ओळख प्रभावीपणे करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग निर्यातीला देशपातळीवर आणि जागतिक स्तरावर निश्चितच मोठी चालना मिळेल. महाराष्ट्राकडे भक्कम उत्पादन पाया, उत्कृष्ट कुशल मनुष्यबळ आणि उत्तम संशोधन संस्था असून, या बळावर आपण वस्त्रोद्योगाच्या विकासाचा एक नवा टप्पा सुरू करत आहोत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi