Monday, 13 July 2026

पश्चिम विदर्भात औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम

 पश्चिम विदर्भात औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी

शासनाचे विविध उपक्रम

- उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

 

मुंबई, दि. १० : पश्चिम विदर्भातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून अमरावती येथे पीएम टेक्सटाईल पार्कला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये लॉजिस्टिक्स हब, क्लस्टर विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ.परिणय फुके यांनी पश्चिम विदर्भातील औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत भावना गवळी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi