Wednesday, 8 July 2026

महिलांनी शिक्षण, उद्योग, विज्ञान, प्रशासन, क्रीडा, राजकारण आणि शेतीसह प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा

 कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सभागृहात सदस्यांनी केलेल्या सूचना आणि अभिनव पद्धतीने अंमलबजावणीसाठी चर्चेच्या माध्यमातून दिलेले योगदान महत्वाचे आहे. महिलांनी शिक्षण, उद्योग, विज्ञान, प्रशासन, क्रीडा, राजकारण आणि शेतीसह प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ती केवळ आई, बहीण, पत्नी किंवा लेक म्हणूनच नव्हे, तर स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि समान अधिकार असलेली नागरिक म्हणून तिचा सन्मान व हक्क मिळणे आवश्यक आहे. या विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संघर्ष करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील महिलाभगिनींचा सन्मान केला जात आहे. राज्य शासन त्यांच्यासाठी शक्य ते सर्वकाही करेल आणि सक्षमीकरणासाठी खंबीरपणे सोबत राहील, असेही मंत्री भरणे यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi