14 खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान
विविध क्रीडा प्रकारांतील 14 खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार तसेच विशेष पुरस्कार प्रदान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. व्हॉलीबॉल : कर्मण्य चिलकुलवार, अॅथलेटिक्स : अंजली मडावी, खो-खो : सिद्धेश सातपुते , सॉफ्टबॉल : उर्वशी सनेश्वर, हँडबॉल : हरप्रीतसिंग रंधावा, कबड्डी : मंगला ढबाले , स्केटिंग : अदिती धांडे, बुद्धिबळ : श्रद्धा बजाज, कुस्ती : नंदिनी साहू, बॅडमिंटन : निशिका गोखे, योगासन : भरत डेलिकर , बास्केटबॉल : गुंजन मंत्री , जिम्नॅस्टिक : अवनी राठोड, जलतरण : अदित्री पयासी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यंदा काही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे यांना तर उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग यांना तसेच क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ म्हणून यंग मुस्लिम फुटबॉल क्लब यांना गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment