Wednesday, 20 May 2026

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज ; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी

 अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज ;

अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. २० : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ सौर आणि पवन उर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसून अणुऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर)  ही भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यूएस न्यूक्लिअर एक्झिक्यूटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट आणि युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

बैठकीस ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर  मुख्य सचिव लोकेश चंद्रा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, महाजनकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन बी., मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे यांच्यासह अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोर्सनिक, सेंट्रस एनर्जीचे उपाध्यक्ष डॅन लिस्टिको, क्लीन कोअर थोरियम एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेहुल शाह, न्यूक्लिअर कर्टिस-राइट कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष गॅरी वोल्स्की, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, एडलो इंटरनॅशनल कंपनीचे अध्यक्ष जॅक एडलो, तसेच होल्टेक एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि धोरणात्मक भागीदारी प्रमुख अनंत जैन यांच्यासह विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi