Tuesday, 19 May 2026

गुलदार पाहण्यासाठी पाणबुडी निर्मितीचे काम सुरू आहे. दीडवर्षात पाणबुडी तयार होऊन पर्यटकांच्या सेवेत

 गुलदार पाहण्यासाठी पाणबुडी निर्मितीचे काम सुरू आहे. दीडवर्षात पाणबुडी तयार होऊन पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारतीय नौदलातील सेवामुक्त युद्धनौका असलेली आयएनएस गुलदार अनेक दशकांपासून देशसेवेत कार्यरत होती. सैनिक, उपकरणे आणि आवश्यक साहित्य वाहून नेण्यापासून ते विविध समुद्री आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांपर्यंत या जहाजाने मोलाची कामगिरी बजावली. जवळपास चार दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर आता या जहाजाचे रूपांतर समुद्राखालील पर्यटन आणि समुद्री जीवसंवर्धनाच्या केंद्रात करण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किनारपट्टीजवळील निवती रॉक्स परिसरात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. समुद्रतळापासून सुमारे 22 मीटर खोलीवर हे जहाज सुरक्षितपणे स्थापित केले जाणार आहे. वैज्ञानिक अभ्यासानंतर निवडण्यात आलेले हे ठिकाण समुद्री पर्यटन आणि जैवविविधतेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जात असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi