Wednesday, 20 May 2026

दूरसंचार अभियंत्यांच्या प्रशिक्षण व क्षमता विकासाला गती देण्यासाठी तेजस नेटवर्क्ससोबतची भागीदारी

 महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, दूरसंचार अभियंत्यांच्या प्रशिक्षण व क्षमता विकासाला गती देण्यासाठी तेजस नेटवर्क्ससोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डिजिटल महाराष्ट्रया आधुनिक आणि सर्वसमावेशक संकल्पनेच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीएसएनएल ४जी/५जी, भारतनेट, नॅशनल नॉलेज नेटवर्क तसेच संरक्षण आणि सार्वजनिक नेटवर्क प्रकल्पांमध्ये तेजस नेटवर्क्सचा मोठा अनुभव असल्याने ही भागीदारी राज्यासाठी लाभदायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

तेजस नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अर्नोब रॉय यांनी सांगितले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानात प्राविण्य असलेले मनुष्यबळ आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण अभियंत्यांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची कंपनीची बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi