लोकसहभागातून आरोग्य समृद्धीकडे आरोग्य विभागाची वाटचाल
- एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी
मुंबई : दि.१४: राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजात अधिक समन्वय, गुणवत्ता सुधारणा आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे वतीने राज्यातील सर्वसामान्य नागरिकाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमआरआय, सिटी स्कॅन, डायलेसिस, स्टेमी प्रकल्प, टेलिमेडिसीन यासह अनेक दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आरोग्यसेवा लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘माझ गाव आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्वपूर्ण अभियान सुरू आहे. त्याच महत्वकांक्षेने आरोग्य विभागाचे उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी आरोग्य विभागाने विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत ग्रामीण व शहरी भागात आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये, सामान्य रुग्णालये, प्रादेशिक मनोरुग्णालये तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांसारख्या आरोग्य संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून, त्यांचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी नवीन समिती रचना लागू करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार, ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य स्तरावर स्वतंत्र ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ गठित करण्यात येणार आहे. ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील समितीचे अध्यक्ष संबंधित आमदार असतील, तर तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समितीत खासदार, विधान परिषद सदस्य निमंत्रित सदस्य असतील, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
महानगरपालिका क्षेत्रातील समित्यांमध्ये संबंधित आमदार अध्यक्ष असून, महापौर, उपमहापौर, आरोग्य समिति सभापती, खासदार व विधान परिषद सदस्य निमंत्रित सदस्य असतील, तसेच महानगरपालिका सदस्य, शिक्षण व महिला-बाल विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
जिल्हा स्तरावरील समितीचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर सहपालकमंत्री सह-अध्यक्ष म्हणून काम पाहतील. समितीत खासदार, विधान परिषद आमदार, महापौर
No comments:
Post a Comment