Saturday, 30 May 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे राज्याच्या ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे राज्याच्या ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य

                                                - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

            मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाद्वारे राज्यात उत्तमोत्तम कार्य होत आहे. याचाच परिपाक म्हणून रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कारामध्ये नागपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कार्य करत या पुरस्कारावर आपले नाव कोरल्याच्या भावना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केल्या.

 

        नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर उल्लेखनीय विकासात्मक कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत व संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी 'ग्रामीण विकास पुरस्कार 2026' देऊन गौरविण्यात आले.

 

     लोकसहभाग क्षेत्रात गौरवास्पद ग्रामपंचायत, गुन्हेगारी मुक्त, दारूबंदी व महिला संरक्षण क्षेत्रात उत्तम ग्रामपंचायत, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय ग्रामपंचायत, जलसमृद्ध गाव क्षेत्रात कौतुकास्पद ग्रामपंचायत, उपजीविका क्षेत्रात उल्लेखनीय ग्रामपंचायत, शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण ज्ञानवर्धिनी शाळा, आरोग्य क्षेत्रात प्रशंसनीय प्राथमिक आरोग्य केंद्र, आदर्श ग्रामपंचायत आणि ग्राम विकासासाठी सातत्यपूर्ण  सीएसआर योगदान या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. डॉ. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी पुरस्कार निवडीबाबत माहिती दिली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi