Monday, 20 April 2026

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज ; उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा

 संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज ;

उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा

Q– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा

·         पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे

·         वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा

·         खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा

 

मुंबईदि. २० : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीप्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजनजलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक  झाली.  बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणेकृषिवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह कृषीमदत व पुनर्वसनवित्तजलसंपदाजलसंधारणभारतीय हवामानशास्त्र विभागवित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi