Tuesday, 21 April 2026

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ

  

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्णरुग्णालये आणि

शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पणआरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रिकरणासाठी वॉर रूम स्थापन

 

मुंबई दि.20 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहतारुग्णरुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या कामकाजाचा आढावा व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन तसेच राज्यामध्ये कार्यरत आरोग्यविषयक योजनांचे एकत्रिकरण करण्यात येऊन वॉर रूम स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण  करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाव्दारे नवीन ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi