Tuesday, 14 April 2026

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश

 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत

शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्थाशेतकरी उत्पादक कंपन्याआत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गटमहिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांकडे किमान ५० सदस्य५ लाख रुपये भागभांडवल आणि मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे आवश्यक ठेवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi