खरेदीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय
– अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. ८ : खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र शासनाने 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment