आखाती देशातील भारतीय नागरिकांना
मार्गदर्शक सूचना
मुंबई, दि. २८ : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील सर्व भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचा, आवश्यक ती काळजी घेण्याचा, सतर्क राहण्याचा तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांकडून आणि दूतावासाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सुरक्षा मार्गदर्शक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अबू धाबी येथील भारतीय दूतावास आणि दुबई येथील वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन चौकशीसाठी यूएईमधील भारतीय नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल-फ्री क्रमांक: 800-46342, व्हॉट्सअॅप: +971543090571, ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.in
No comments:
Post a Comment