Sunday, 22 March 2026

पूर्वी रात्री १२ ते ६ या वेळेत वीज वापरासाठी सवलत दिली जात

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीपूर्वी रात्री १२ ते ६ या वेळेत वीज वापरासाठी सवलत दिली जात असेकारण तेव्हा वीज शिल्लक असायची. मात्रआता सौर ऊर्जेमुळे दिवसा (सकाळी ९ ते ५) विजेची उपलब्धता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरण बदलून दिवसा वीज वापरणाऱ्यांना २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा उद्योगांना होणार आहे.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमइआरसीवीज खरेदीच्या अंदाजात आणि भांडवली खर्चात काही तांत्रिक चुका केल्या होत्या. यामुळे महावितरणचे सुमारे ८०,००० कोटी रुपयांचे एनर्जी चार्जेस आणि ५५,००० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा खर्च नाकारला गेला असता. राज्य शासनाने या चुका आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान टळले आणि ग्राहकांवरील संभाव्य दरवाढीचा भार कमी झाला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi