महालक्ष्मी सरस येथील महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची विक्री, बाजारपेठेतील प्रतिसाद आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
तसेच उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उमेद अभियानाचे मुख्य परिचलन अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालिका अंशूजा गराटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी उमेद अभियानाचे जिल्हा व तालुका कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रसंगी आभार अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी मानले, तर सूत्रसंचालन अमोल बाविस्कर यांनी केले.
No comments:
Post a Comment