Tuesday, 31 March 2026

नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

 नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर

एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

महाराष्ट्रातील नागपूरचंद्रपूरभंडारावर्धागडचिरोलीअमरावतीअकोलालातूरधाराशिवसोलापूरजळगावसिंधुदुर्गनांदेडठाणेपालघरनंदुरबारसोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसारमहाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडाराचंद्रपूरनागपूरगडचिरोली आणि गोंदिया.

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होतेत्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कीअफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नसल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi