Thursday, 26 March 2026

आस्थापनांनी नोंदणी न केल्यास दंड आकारणार ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर अंतर्गत समिती नोंदणी अनिवार्य

 

  • आस्थापनांनी नोंदणी न केल्यास दंड आकारणार

शी-बॉक्स पोर्टलवर अंतर्गत समिती नोंदणी अनिवार्य

 आयुक्त नयना गुंडे

 

मुंबई, दि. २४ : महिलांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसरासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनात अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असून, या समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या शी-बॉक्स’ (She-Box) पोर्टलवर करणे आवश्यक असल्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

राज्यात आतापर्यंत २२,०५२ आस्थापनांनी या पोर्टलवर नोंदणी केली असून, उर्वरित आस्थापनांनीही तातडीने नोंदणी करावी, अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi