राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार
मुंबई, दि. २५ : राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, कायदा-सुव्यवस्थेचे बळकटीकरण, गुन्हेगारी नियंत्रण, सायबर गुन्ह्यांवर आळा आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा या सर्व क्षेत्रांत राज्य शासन व्यापक पातळीवर काम करत ठोस प्रगती साधत आहे. राज्यात गुन्हेगारीत घट झाली असून न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पोलीस दलाचे सशक्तीकरण आणि जलद न्यायप्रक्रिया यावर भर देत राज्यातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.
No comments:
Post a Comment