Sunday, 1 March 2026

आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना

 आखाती देशातील भारतीय नागरिकांना

मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २८ : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरसंयुक्त अरब अमिराती (यूएईमधील सर्व भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचाआवश्यक ती काळजी घेण्याचासतर्क राहण्याचा तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांकडून आणि दूतावासाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सुरक्षा मार्गदर्शक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अबू धाबी येथील भारतीय दूतावास आणि दुबई येथील वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन चौकशीसाठी यूएईमधील भारतीय नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा: टोल-फ्री क्रमांक: 800-46342, व्हॉट्सअ‍ॅप: +971543090571ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.in

तेल अवीव

 सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरइस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सर्व वेळ सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी इस्रायली अधिकाऱ्यांकडून आणि होम फ्रंट कमांडकडून जारी करण्यात आलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेअसा कडक सल्ला देण्यात आला असून अद्ययावत सूचना खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
https://www.oref.org.il/eng सर्व भारतीय नागरिकांनी नियुक्त आश्रयस्थळांच्या जवळ राहावे तसेच आपल्या निवासस्थान किंवा कार्यस्थळाजवळील संरक्षित जागांची माहिती करून घ्यावी. पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमधील सर्व अनावश्यक व गैर-आवश्यक प्रवास टाळावाअसा सल्ला देण्यात आला आहे.

नागरिकांनी स्थानिक बातम्याअधिकृत घोषणा आणि आपत्कालीन इशारे यांचे नियमितपणे निरीक्षण करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतभारतीय नागरिकांनी तेल अवीव येथील भारतीय दूतावासाशी पुढील २४x७ हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा: दूरध्वनी: +972-54-7520711; +972-54-2428378, ई-मेल: cons1.telaviv@mea.gov.in

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi