Thursday, 19 February 2026

जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने; अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे

 जनगणना २०२७ डिजिटल पद्धतीने;

अचूकतेसह राष्ट्रीय मानकांचे पालन व्हावे

महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण

मुंबईदि. ९ : जनगणना हा विकास नियोजनाचा भक्कम पाया आहे. जनगणना २०२७  डिजिटल पद्धतीने होणार असून ती अचूकपारदर्शकपणे करताना राष्ट्रीय मानकांचे पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावेअसे आवाहन महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांनी जनगणना २०२७ च्या अनुषंगाने आयोजित राज्यस्तरीय सम्मेलनात केले.

सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या या लनात महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त, मृत्युंजयकुमार नारायण व मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी  दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.  या परिषदेस अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्याससंचालक तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्यासह विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi