पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार, दोन मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध
पीईटी बाटल्यांच्या संकलन-पुनर्वापरासाठी पर्यावरण विभाग व
कोकाकोला यांच्यात देशातील पहिला सामंजस्य करार
मुंबई, दि. १८ :- हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने मुंबई क्लायमेट वीक २०२६ दरम्यान दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्य हवामान कृती कक्षाने क्लायमेट ट्रेड एलएलपी सोबत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज कंपनीसोबत महा-आरईपीटी अभियान राबविण्यासंदर्भात करार केला. पीईटी बाटल्यांचे संकलन व पुनर्वापरासाठी पहिल्यांदाच देशात कोकाकोला कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.
No comments:
Post a Comment