अंधेरी पश्चिम ते अंधेरी पूर्वला जोडणाऱ्या अंधेरी सबवे व्यतिरिक्त गोखले ब्रिज मुख्य रस्ता आहे. गोखले ब्रिजच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. अति पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद ठेवल्यास एस.व्ही. रोडवरील वाहतूक गोखले ब्रिजवर वळविण्यात येते. त्यामुळे अंधेरी पश्चिमेला वाहतूक कोंडीची समस्या होत नाही. मात्र ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला तर इथे पाणी साचू नये म्हणून १९७ कोटीचे काम प्रस्तावित आहे. या प्रश्नाबाबत सर्व विभागांची बैठक घेऊन यातून मार्ग काढणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अमित साटम, दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment