Thursday, 19 February 2026

पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

 पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

                                                - राज्यपाल आचार्य देवव्रत

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप

 

            मुंबई, दि. 19 : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहेशिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्‍ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi