एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन
-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
· २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद
मुंबई, दि. १८ : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment